पुणेकरांसाठी मोठी बातमी ! ‘या’ 6 मार्गांवर आता रात्रीच्या वेळी पण धावणार बस, पीएमपीच्या रातराणी बससेवेचा फायदा कुणाला? 

Published on -

Pune News : शिक्षणाचे माहेरघर आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात रात्रीचा प्रवास म्हणजे खिशाला झळ. जे लोक नाईट शिफ्टला काम करतात त्यांना रात्री घरी जाताना खिसा रिकामा करूनच जावा लागतो. कारण की रात्री घरी जाण्यासाठी नागरिकांना महागड्या कॅबची सेवा घ्यावी लागते.

रात्रीच्या वेळी कॅब सेवेचे चार्जेस अधिक असतात. यामुळे सर्वसामान्यांना नाईट शिफ्ट झाल्यानंतर घरी जाणे डोईजड ठरते. महिन्याकाठी कॅबच्या भाड्याचा खर्च हा कधी कधी तर किराण्यापेक्षा अधिक असतो. अशी ही सगळी परिस्थिती असतानाच आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा आणि अगदीच दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

आता पुण्यात नाईट शिफ्ट झाल्यानंतरही नागरिकांना घरी जाताना अधिक पैसा खर्च करावा लागणार नाही. कारण की रात्रीच्या वेळेस आता पीएमपीच्या रातराणी बस सेवेला सुरुवात होणार आहे. यामुळे आता नागरिकांना मध्यरात्र झाल्यानंतरही मनसोक्त आपल्या घरी जाता येणे शक्य होणार आहे.

यामुळे पीएमपीच्या या निर्णयाचे सध्या पुणेकरांच्या माध्यमातून तोंड भरून कौतुक केले जात आहे. कामगार, विद्यार्थी, महिला प्रवासी आणि नाईट शिफ्टमधील कर्मचाऱ्यांसाठी रात राणी बस सेवा फायद्याची ठरणार असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सुरक्षित प्रवास परवडणारा प्रवास यामुळे रातराणी बससेवेला नक्कीच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार आहे. दरम्यान आता आपण पीएमपी कडून चालवली जाणारी ही रातराणी बस सेवा कोणकोणत्या मार्गांसाठी राहील आणि या बससेवेचा टाइमिंग नेमका कसा असेल याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. 

1) पुणे स्टेशन ते कोंढवा गेट – पुणे स्टेशन येथून ही बस दहा वाजता, साडेबाराला आणि तीन वाजून 45 मिनिटांनी सोडली जाणार आहे. तसेच कोंडवा येथून 11 : 15 वाजता, 1: 45 वाजता आणि पाच वाजता बस सुटणार आहे.

2) वाकडेवाडी मार्गे निगडी ते पुणे स्टेशन – निगडी येथून साडेअकरा वाजता, दीड वाजता आणि साडेतीन वाजता बस सोडली जाणार आहे. तसेच पुणे स्टेशन येथून साडेबारा वाजता, अडीच वाजता आणि साडेचार वाजता बस सोडली जाणार आहे.

3) हडपसर ते पुणे स्टेशन – हडपसर येथून 10 : 20, 11 : 40, 1:00 आणि 3:45 वाजता बस सोडली जाणार आहे. तसेच पुणे स्टेशन येथून 10:50, 12:20, 1:40 आणि 4:15 वाजता बस सोडली जाईल.

4) हडपसर ते स्वारगेट – दहा वाजून वीस मिनिटांनी, 11:40 मिनिटांनी, एक वाजता आणि तीन वाजून 45 मिनिटांनी बस सोडली जाणार आहे. स्वारगेट येथून दहा वाजून पन्नास मिनिटांनी, 12 वाजून वीस मिनिटांनी, एक वाजून 40 मिनिटांनी आणि चार वाजून 15 मिनिटांनी बस सोडली जाणार आहे.

5) कात्रज ते पुणे स्टेशन – कात्रज येथून अकरा वाजता, साडेबारा वाजता, दोन वाजता आणि तीन वाजून 25 मिनिटांनी बस सोडली जाणार आहे. तसेच पुणे स्टेशन येथून अकरा वाजून पन्नास मिनिटांनी, एक वाजून वीस मिनिटांनी, दोन वाजून 40 मिनिटांनी आणि चार वाजून दहा मिनिटांनी बस सोडली जाणार आहे.

6) कात्रज ते वाकडेवाडी येथील नवीन एसटी स्थानक – कात्रज येथून साडेअकरा वाजता, दीड वाजता आणि साडेतीन वाजता बस सोडली जाणार आहे. तसेच वाकडे वाडी येथील नवीन एसटी स्थानकातून साडेबारा वाजता, अडीच वाजता आणि साडेचार वाजता बस सोडली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News