पुणे – नगर महामार्गावर डबल डेकर उड्डाणपूल! वर मेट्रो, खाली बस धावणार, कसा असणार रूट?

Published on -

Pune News : गत काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रस्ते विकासाचे असंख्य प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक छोटे मोठे प्रकल्प पूर्णत्वास केले आहे. तसेच आजही काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर कार निकाली निघाला आहे. रामवाडी ते वाघोली दरम्यान मेट्रोसह दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या कामाशी संबंधित निर्माण झालेला तिढा सोडवण्याला शासन आणि प्रशासनाला यश आले आहे. आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) यांना सदर प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

त्यामुळे आता हा डबल डेकर उड्डाणपूल नियोजित वेळेत पूर्ण होईल व या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल अशी आशा आहे. रामवाडी-वाघोली 11.63 किमी लांबीचा डबलडेकर कॉरिडॉर उभारण्याचे काम आता महामेट्रोकडून केले जाणार आहे.

या मार्गावर मेट्रो रेल्वेसह वाहनांसाठी स्वतंत्र उड्डाणपूलही उभारला जाणार असून, संपूर्ण प्रकल्पावर सुमारे 3626 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चातील अतिरिक्त भागाची तरतूद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमएसआयडीसी) करणार आहे.

यापुढील म्हणजे वाघोलीनंतरचा विस्तार मात्र एमएसआयडीसीमार्फत पूर्ण केला जाईल. पूर्वी एमएसआयडीसीने फ्लायओव्हरसाठी स्वतंत्र निविदा काढल्याने कामाचा समन्वय न साधता आल्याने प्रकल्प रखडला होता.

मात्र, अलीकडेच एमएसआयडीसी, महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या संयुक्त बैठकीत अखेर स्पष्ट निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला केंद्र सरकारचीही औपचारिक मंजुरी मिळाल्याने पुणेकरांच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा ठरत आहे.

वनाझ-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली (विठ्ठलवाडी) या दोन्ही मार्गिकांसाठी एकूण ३,७५६ कोटी ५८ लाख रुपयांचा आराखडा मान्य झाला आहे. सध्या मेट्रो कामांसाठी कर्ज उपलब्ध झाले असले, तरी उर्वरित निधी उभारणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे.

त्यानंतर कामाचा वेग वाढवला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्याच्या पूर्वेकडील वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, तसेच प्रवाशांना मेट्रो आणि फ्लायओव्हरच्या दुहेरी सुविधेचा लाभ एकाच प्रकल्पातून मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News