पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! पीएम आवास योजनेअंतर्गत ‘इतक्या’ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर, पण….

महाराष्ट्र राज्य शासनाकडून रमाई आवास योजना शबरी आवास योजना नमो आवास योजना अशा अनेक घरकुलाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान याच पीएम आवास योजनेबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. हे अपडेट पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे.

Published on -

Pune News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. जे लोक बेघर आहेत अशा लोकांसाठी घरकुलाच्या देखील अनेक योजना सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनांमुळे आतापर्यंत हजारो लाखो लोकांना आपले हक्काचे घर उपलब्ध झाले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाकडून रमाई आवास योजना शबरी आवास योजना नमो आवास योजना अशा अनेक घरकुलाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेचं केंद्राकडून पीएम आवास योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते.

दरम्यान याच पीएम आवास योजनेबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. हे अपडेट पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील हजारो नागरिकांसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तब्बल ३३ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून यापैकी तब्बल वीस हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून समोर आली आहे. परंतु अजूनही या योजनेच्या जवळपास १३ हजार लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

पुणे जिल्ह्यासाठी किती उद्दिष्ट आहे?

खरेतर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे जिल्ह्याला ३७ हजार घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ३३ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.

अन मंजूर झालेल्या वीस हजार लाभार्थ्यांना याचा पहिला हप्ता सुद्धा मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

बालेवाडी येथील कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या हस्ते या हफ्त्याचे वाटप केले आहे. अमित शहा यांच्या हस्ते एकूण मंजूर लाभार्थ्यांपैकी सुमारे १९ हजार जणांच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. त्यानंतर आणखी एक हजार लोकांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

दरम्यान या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना एकूण एक लाख २० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र हे पैसे लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

यासाठी पुणे जिल्ह्यात एकूण ३० कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती सरकारकडून समोर आली आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांपैकी सुमारे १३ हजार लाभार्थी घरकुलासाठी अजूनही प्रतिक्षेत आहेत.

स्‍वत:ची जागा आणि कागदपत्रे नसल्‍याने घरकुलसाठी अनुदान देणे जिल्‍हा परिषदेपुढे आव्‍हान बनले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. त्‍यामुळे आता या प्रतिक्षेत असणाऱ्या गरजू १३ हजार लाभार्थ्यांना हक्‍काची घरे मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून आता या प्रलंबित लाभार्थ्यांच्या बाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe