पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 54 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाच्या मार्गात मोठा बदल, आता कसा राहणार नवा रूट? पहा…

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Published on -

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी देखील शासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक नवीन उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. दरम्यान याच उड्डाणपूल प्रकल्पाच्या बाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

खरेतर, पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतूक कोंडी आणि वडगाव शेरी मतदारसंघातील पाणीटंचाईच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतले होते.

यात त्यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, उड्डाणपूल वाघोलीपासून न करता विमाननगरपासून सुरू करावा, असा निर्णय घेतला आहे. पुणे ते शिरूर मार्गावरील या उन्नत महामार्गाच्या रचनेत हा बदल करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

याशिवाय, नगर रस्त्यावरील अर्धवट आणि अपघाती बीआरटी मार्गिका तात्काळ हटविण्याचा आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्कीच दूर होणार आहे आणि यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

वडगाव शेरी आणि आसपासच्या भागांमध्ये पाणीटंचाईच्या वाढत्या समस्येला गंभीरतेने घेत अजित पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले.

वडगाव शेरी, गणेशनगर, सोमनाथनगर, खराडी, विमाननगर या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मदत करण्याचे निर्देश दिले.

यामध्ये, महापालिकेच्या पाणीपुरवठा टँकरवर ‘विनाशुल्क टँकर’ असं स्पष्ट चिन्ह लावण्याची सूचना करण्यात आली आहे. येरवडा येथील म्हाडा हाउसिंग बोर्डाच्या पुनर्विकासासाठी महापालिकेच्या परवानग्या रखडल्या होत्या.

यावरही अजित पवार यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधत, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना परवानग्या तात्काळ देण्याचे निर्देश दिले. या सर्व उपाययोजनांमुळे पुणे शहरातील महत्त्वाच्या समस्या लवकरात लवकर सुटतील अशी आशा निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe