पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्टेशनपासून घरापर्यंत मोफत बससेवा

Published on -

Pune News : मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही आता मेट्रोचे जाळे तयार होत आहे. सद्यस्थितीला पुण्यात दोन मार्ग कार्यान्वित आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका – स्वारगेट व वनाज – रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरु झाली आहे.

दरम्यान आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता घरापासून मेट्रो स्टेशनवर व स्टेशनवरून घरापर्यंत मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी ही शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. या शटल सेवेसाठी चार बसेस उपलब्ध झाल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने ही बस सेवा सुरू झाली आहे.

यामुळे कोथरूड मधील नागरिकांना एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हिटी चा लाभ मिळणार असून मेट्रो ने प्रवास करणाऱ्यांची संख्या आगामी काळात आणखी वाढणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. पीएमपी आणि महा मेट्रोच्या मदतीने ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

या शटल बस सेवेमुळे सर्वसामान्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे सोबतच पैशांची ही बचत होणार आहे. 2022 मध्ये वनाज ते गरवारे महाविद्यालय यादरम्यान मेट्रो सुरू झाली. यानंतर मेट्रो रामवाडी पर्यंत सुरू झाली.

वनाज – रामवाडी हा पूर्ण मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. पण मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्यांना अधिकचा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.

यामुळे शटल सेवेची मागणी पुढे आली होती. शटल सेवा सुरू झाल्यास कोथरूड मधील नागरिकांना मोठा फायदा होणार होता. यानुसार आता कोथरूडकारांसाठी शटल बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

या बसेस सोमवार ते शनिवार पर्यंत सुरु राहणार आहेत. या बससेवेसाठीच्या मार्गाचे नियोजन महा मेट्रो सोबत चर्चा करून झाले आहे. तसेच आता नागरिकांच्या मागणीनुसार या बसेसला थांबा दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe