शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी देशातील ‘या’ 10 राज्यांमधील लोक पुण्यात येतात ! पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण ?

अलीकडील काही वर्षांमध्ये पुण्यात परप्रांतीयांची संख्या वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी पुणेरी मराठी सोबतच आपल्याला हिंदी, भोजपुरी, गुजराती, कन्नड, बंगाली अशा अनेक भाषा ऐकायला मिळतात. पण तुम्हाला पुण्यामध्ये कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त वास्तव्याला आहेत याची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत माहिती पाहूयात.

Published on -

Pune News : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा सिंहाचा वाटा आहे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांचा सिंहाचा वाटा आहे.

पुणे हे शहर राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे. अलीकडे पुण्याला आयटी हब अशी नवीन ओळख प्राप्त झाली आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर सुद्धा म्हणतात कारण की इथे विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत तसेच लाखो विद्यार्थी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात.

हेच कारण आहे की पुण्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील नागरिक शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. तसेच राज्याबाहेरील लोक देखील शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात येत आहेत. अशा स्थितीत आज आपण सांस्कृतिक राजधानी पुण्यात कोणत्या 10 राज्यांमध्ये लोक सर्वात जास्त येतात? याची माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

पुण्यात या 10 राज्यांची लोक सर्वात जास्त येतात

उत्तर प्रदेश : या यादीत उत्तर प्रदेशचा पहिला नंबर लागतो. या राज्यातील सर्वाधिक लोक रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात येतात. या राज्यातील जवळपास पाच ते सात लाख लोक पुण्यात येतात. हे लोक छोट्या मोठ्या रोजगारासाठी तसेच कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी येतात.

बिहार : या यादीत बिहार राज्याचा दुसरा नंबर लागतो. या राज्यातील जवळपास चार ते सहा लाख लोक रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात आले आहेत.

कर्नाटक : अलीकडेच केंद्रीय विधिमंडळात केंद्रातील सरकारने देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांची यादी जाहीर केली. पर कॅपिटा इन्कम नुसार देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांमध्ये कर्नाटक या राज्याने पहिला नंबर मिळवला आहे. मात्र कर्नाटकातील लाखो लोक कामानिमित्ताने महाराष्ट्रात येतात.

कर्नाटकातील जवळपास तीन ते चार लाख लोक रोजगारासाठी पुण्यात आले आहेत आणि म्हणूनच हे राज्य या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील बहुसंख्य लोक पुण्यातील आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत.

आंध्रप्रदेश, तेलंगाना : पुण्याला आयटी हब म्हणून ओळखले जाते. कारण येथे अलीकडील काही वर्षांमध्ये मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहेत. पुण्यातील आयटी कंपन्या हिंजवडी परिसरात आहेत. याच भागात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील लोक आयटी कंपन्यांमध्ये कामासाठी मोठ्या संख्येने आले आहेत. यामुळे हे राज्य या यादीत चौथ्या क्रमांकावर येते.

तामिळनाडू : तामिळनाडूमधील बहुसंख्य लोक आयटी कंपन्यांमध्ये कामासाठी पुण्यात आलेले आहेत. आयटी इंजीनियरिंगच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी तामिळनाडू राज्यातील लोक पुण्यात मोठ्या प्रमाणात काय झाले आहेत आणि म्हणूनच हे राज्य या यादीत पाचव्या क्रमांकावर येते. 

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात दाखल झालेले आहेत. यासोबतच मजुरीसाठीही बहुसंख्य नागरिक पुण्यात वास्तव्याला आहेत म्हणूनच ह्या यादीत मध्य प्रदेश राज्याचा सहावा नंबर लागतो. मध्यप्रदेशातील जवळपास एक ते दोन लाख लोक पुण्यात आहेत.

गुजरात : गुजरात मधील नागरिक देखील व्यवसाय शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात आलेले आहेत. गुजरात मधील एक ते दोन लाख लोक पुण्यात आहेत. पुण्यात हे लोक मिठाईचे व्यापार मोठ्या प्रमाणात करतात. हे राज्य या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

राजस्थान : शिक्षणासाठी तसेच छोट्या-मोठे व्यवसायासाठी राजस्थानमधील हजारो लोक पुण्यात आले आहेत. यामुळेच हे राज्य या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

पश्चिम बंगाल : पुण्यात बंगाली लोक देखील मोठ्या प्रमाणात दिसतात. पुण्यातील कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर येथे बंगाली लोकांची संख्या अधिक आहे. शिक्षणासाठीच तसेच आयटी कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी या राज्यातील लोक येथे येतात. म्हणूनच हे राज्य या यादीत नवव्या स्थानी आहे.

केरळ : वैद्यकीय, नर्सिंग, आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी केरळ राज्यातील बहुतांशी लोक पुण्यात आलेले आहेत. या यादीत केरळ राज्याचा दहावा नंबर लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!