पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ; पुण्यातून चालवली जाणार स्पेशल ट्रेन ! वाघा बॉर्डर, वैष्णो देवी, दिल्ली एकाच ट्रिपमध्ये, कस असणार वेळापत्रक?

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीकडून पुण्यातील पर्यटकांसाठी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष रेल्वे गाडी येत्या दोन दिवसांनी अर्थातच 17 एप्रिल 2025 रोजी पुण्यावरून सोडली जाणार आहे. या विशेष रेल्वे गाडीच्या रूट बाबत बोलायचं झालं तर पुण्यावरून सुरू होणारी ही यात्रा सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराची राहील.

Published on -

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांसाठी एक अशी स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे जी ट्रेन वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणार आहे. यामुळे पर्यटकांना एकाच ट्रिपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीकडून पुण्यातील पर्यटकांसाठी एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणेकरांसाठी रेल्वेच्या माध्यमातून विशेष पर्यटन सेवा सुरु करण्यात आली असून या सेवेमुळे उत्तर भारतातील अनेक प्रमुख पिकनिक स्पॉटवर पर्यटकांना भेटी देता येणार आहेत.

ही यात्रा जवळपास पाच हजार किलोमीटर लांबीची राहणार असून या यात्रेदरम्यान नागरिकांना विविध धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देता येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक ?

आयआरसीटीसीने उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपा नावाने या विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. ही विशेष रेल्वे गाडी येत्या दोन दिवसांनी अर्थातच 17 एप्रिल 2025 रोजी पुण्यावरून सोडली जाणार आहे.

या विशेष रेल्वे गाडीच्या रूट बाबत बोलायचं झालं तर पुण्यावरून सुरू होणारी ही यात्रा सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराची राहील. या यात्रेदरम्यान हरिद्वार, हृषीकेश, अमृतसर, वैष्णोदेवी (कटरा), मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन दहा दिवसांनी ही ट्रेन पुन्हा एकदा पुण्यात येणार आहे.

या ट्रेनची आसनक्षमता 750 लोकांची आहे. महत्त्वाचे म्हणजे या ट्रेनमध्ये प्रथम येणाऱ्या प्राधान्य राहणार आहे. या रेल्वे गाडीमध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रस्ता, वापी, सुरत, बडोदा या रेल्वे स्थानकावरून बसता येईल. या ट्रिप मध्ये प्रवाशांना हरिद्वारमधील हृषीकेश, हर की पौडी, गंगा आरती पाहता येणार आहे. तसेच अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर या ठिकाणी भेट देता येईल.

कटरामधील माता वैष्णोदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. मथुरामधील वृंदावन, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि प्रमुख मंदिरात दर्शन घेता येणार आहे. आग्रामधील ताजमहालला देखील जाता येणार आहे. आता आपण या पुण्यावरून सुटणाऱ्या स्पेशल ट्रेन चे भाडे किती असणाऱ्या याची माहिती पाहूयात.

तिकीट किती असणार ?

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या गाडीने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सामान्य श्रेणी (शयनयान) कोचसाठी 18 हजार 230 रुपये, तृतीय श्रेणी (थ्री टीअर) साठी 33 हजार 880 रुपये आणि द्वितीय श्रेणीसाठी (टू टीअर) 41 हजार 530 रुपये इतके तिकीट लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe