Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही समस्या आजच वाढली आहे असे नाही तर गेल्या काही वर्षांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत असून यामुळे पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
खरेतर, सिंहगड रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे सिंहगड रस्त्यावरील प्रवास फारच आव्हानात्मक बनला असून यामुळे नागरिकांची याच कोंडीतून सुटका व्हावी यासाठी महापालिकेने 2021 मध्ये एक मोठा निर्णय घेतला.

राजाराम पूल ते धायरी या मार्गावर सप्टेंबर 2021 मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. आता गेला काही वर्षांपासून सुरू असणारे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) राजाराम पूल ते धायरी या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने लवकरच हा उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या एका महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या उड्डाणपूल प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती हाती आली आहे.
महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून डिसेंबर 2025 पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते. पण या प्रकल्पाचे काम गेल्या काही महिन्यांपासून जलद गतीने करण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत या पुलाचे काम 90 टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे.
यामुळे हे काम नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल आणि लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे म्हटले जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं गेलं आहे की या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. आता रंगरंगोटी, पथदिवे व दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे.
म्हणून एका महिन्यात हे काम पूर्ण होईल असे म्हटले जात आहे. यामुळे एका महिन्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे झाल्यास सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.