पुणेकरांसाठी मोठी बातमी ! नाशिक हायवे आणि मुंबई-पुणे हायवेला जोडणाऱ्या ‘या’ मार्गाचे काम पूर्ण, वाहतूक सुरु, डिटेल्स पहा…

त्रिवेणीनगरला नाशिक महामार्गाला आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणार्‍या मिसिंग लिंकचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. दरम्यान, या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्याने हा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, उर्वरित सहायक कामे वेगाने प्रगती करत आहेत आणि लवकरच रस्ता पूर्णपणे कार्यरत होईल.

Published on -

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पण शहरातील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून निगडीमधील त्रिवेणीनगरला नाशिक महामार्गाला आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडले जात असून आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. त्रिवेणीनगरला नाशिक महामार्गाला आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणार्‍या मिसिंग लिंकचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे.

दरम्यान, या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्याने हा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी भूसंपादन विभागाने आवश्यक जमीन ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित रोडवर्क जलद गतीने पूर्ण झाले.

आतापर्यंत या प्रकल्पाचे 80% काम पूर्ण झाल आहे, एकूण 450 मीटरचा रस्ता विकसित झाला आहे. प्रत्येक बाजूला तीन अशा सहा लेनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त, उर्वरित सहायक कामे वेगाने प्रगती करत आहेत आणि लवकरच रस्ता पूर्णपणे कार्यरत होईल.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा हा रस्ता 75 मीटर रुंद आहे. पण सध्या तो 37 मीटर रुंद इतका विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूस 12 मीटर रुंद (तीन लेन), मध्यभागी 9 मीटर रुंदीचा उच्च क्षमतेचा मास ट्रान्झिट रूट आणि दोन्ही बाजूंनी 2 मीटर रुंदीचे पेव्ह शोल्डर आहेत.

सध्या या प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून एकूण 450 मीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन अशा एकूण सहा लेनचे काम पूर्ण झाले आहे.

याशिवाय, उर्वरित कामे जलद गतीने सुरू असून लवकरच पूर्ण क्षमतेने रस्ता सुरू करण्यात येणार आहे. या रस्ते विकासाच्या प्रकल्पामुळे निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून पुणे-नाशिक आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाशी होणारे दळणवळण सुधारण्यास मदत होईल.

मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक कमी होईल. म्हणून पर्यावरणपूरक वातावरण तयार होणार आहे. हा रस्ता तळवडे आयटी पार्क मार्गे चाकण एमआयडीसीला जोडला जाणार आहे. यामुळे पिंपरीमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe