पुण्याला मिळणार 8,313 कोटी रुपयांचा नवा मेट्रो मार्ग ! तयार होणार ‘ही’ 23 नवीन स्थानके, पहा स्थानकांची संपूर्ण यादी

Published on -

Pune News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका – स्वारगेट आणि वनाज – रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे पुणेकरांकडून या मेट्रो मार्गांना चांगला प्रतिसादही दिला जातोय. अशातच आता आनंदात भर घालणारी बातमी समोर येत आहे. पुण्याला लवकरच तिसरा मेट्रो मार्ग मिळणार आहे. 2026 वर्ष उजाडताच शहराला तिसऱ्या मेट्रो मार्गाची भेट मिळेल.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून याच काम होतंय. याचा रूट शिवाजीनगर – हिंजवडी असा आहे. हिंजवडीला आयटी हब म्हणून ओळखले जाते. या भागात आयटीच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत.

यामुळे येथून शहराच्या मध्यवर्ती भागातील जनता कामानिमित्ताने दररोज अप-डाऊन करत असते. आयटी कंपन्यांमुळे हिंजवडीत वाहनांची सुद्धा मोठी गर्दी होत असते. येथील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे हिंजवडीला मेट्रोची नितांत आवश्यकता होती.

याच अनुषंगाने शासनाकडून हिंजवडी – शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुण्यातील पहिला असा मेट्रो मार्ग आहे जो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर विकसित केला जातोय.

आतापर्यंत या मेट्रो मार्गाचे 87% पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे आणि मार्च 2026 पर्यंत हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत येईल अशी माहिती समोर येत आहे. यामुळे हिंजवडी – शिवाजीनगर हा प्रवास सुखकर होणार आहे.

या मार्गामुळे वाकड आणि हिंजवडीतील नागरिकांचा पुण्याकडील प्रवास वेगवान होईल. या मार्गाबाबत बोलायचं झालं तर याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी फ्रेंच कंपनीकडे देण्यात आली आहे. या मार्गावरील चाचणी आधीच पूर्ण झालीये.

आता पुढील वर्षी हा मार्ग सर्वसामान्यांच्या सेवेत येणार आहे. हा मार्ग 23 किलोमीटरचा आहे. या मार्गासाठी फ्रेंच कंपनी केओलिसचा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडसोबत खास करार झाला आहे. या कराराअन्वये या मार्गाच्या 23 स्थानकांवरील तिकीट व्यवस्थापनाची जबाबदारी सदर कंपनीवर असणार आहे.

22 अल्स्टॉम गाड्यांची देखभालीची जबाबदारी सुद्धा याच कंपनीला सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 8313 कोटी रुपयांचा आहे. या मार्गामुळे हिंजवडी – शिवाजीनगर हा प्रवास 35 – 40 मिनिटांमध्ये होणार आहे. 

कोण कोणती स्थानके असणार 

मेगापोलिस सर्कल

एम्बेसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क

डोहलर

इन्फोसिस फेज २

विप्रो फेज २

पाल इंडिया

शिवाजी चौक

हिंजवडी

वाकड चौक

बालेवाडी स्टेडियम

एनआयसीएमएआर (NICMAR)

रामनगर

लक्ष्मीनगर

बालेवाडी फाटा

बाणेर गाव

बाणेर

कृषी अनुसंधान केंद्र

सकाळनगर

विद्यापीठ

आरबीआय

कृषी महाविद्यालय

शिवाजीनगर

दिवाणी न्यायालय

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News