Pune News : शालेय विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोमवारी पुण्यातील काही रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. तसेच शहरातील शाळा – कॉलेजेस देखील या दिवशी बंद राहणार आहे. याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी नुकताच एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.
रस्ते बंद राहण्याचे कारण
2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन झालंय. उद्या म्हणजेच 19 जानेवारीला ही स्पर्धा होईल. दरम्यान याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

तसेच विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी पुणे शहरातील शाळा आणि कॉलेजेस देखील या दिवशी बंद राहणार आहेत. शहरातील सर्वच कॉलेजेस किंवा शाळा या दिवशी बंद राहणार नाही पण ज्या ठिकाणी या स्पर्धेमुळे वाहतूक कोंडी सारखी स्थिती निर्माण होऊ शकते अशा सर्व शाळा बंद राहतील.
जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा शासन निर्णय
सायकल स्पर्धेतील प्रोलॉग रेस उद्या आहे. या शर्यतीसाठी फर्गसन कॉलेज, गणेशखिंड, जंगली महाराज रस्ता व या सर्व रस्त्यांना जोडणारे सर्व उपमार्ग बंद ठेवले जातील. हे सर्व रस्ते उद्या सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहतील.
आता शहरातील या भागातील रस्ते बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून शाळांना सुट्टी देणे आवश्यक होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी महोदयांनी शहरातील काही भागांमधील अंगणवाड्या, प्राथमिक माध्यमिक विद्यालय महाविद्यालय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था एका दिवसासाठी बंद ठेवल्या आहेत.
या शाळांना सुट्टी
छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड
विश्रामबाग वाडा-कसबा
ढोले पाटील रोड
भवानी पेठ
औंध-बाणेर
कोथरुड-बावधन
सिंहगड रोड
वारजे-कर्वेनगर













