पुणे जिल्ह्यातून जाणारे ‘हे’ दोन महामार्ग प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार ! मुळा-मुठा नदीवर उभारला जाणार नवीन पूल, वाचा….

Published on -

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण केली जात आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुद्धा शहरात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे हाती घेतलेली आहेत.

दरम्यान प्राधिकरणाकडून आता जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे महामार्ग प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार आहेत. यासाठी मुळा मुठा नदीवर एक नवा पूल उभारला जाणार आहे. पी एम आर डी ए च्या माध्यमातून हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथे मुळा मुठा नदीवर एक नवीन पूल उभारला जाणार आहे आणि यामुळे जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे महामार्ग प्रकल्प एकमेकांना जोडले जातील.

दरम्यान आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरेतर, हवेली तालुक्‍यातील गावे आणि महामार्ग जोडण्यासाठी हिंगणगाव येथे‍ पुलाची निर्मिती करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

थेऊर-तारमळा-पेठ-उरुळी कांचन-खामगाव टेक-हिंगणगाव- शिंदेवाडी रस्ता साखळी क्रमांक 17/700 किलोमीटर हिंगणगाव येथे मुळा-मुठा नदीवर हा पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून समोर आली आहे.

दरम्यान आता या बांधकामासाठी जवळपास 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती हाती येत आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 29.37 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आणि या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे.

सप्टेंबर 2024 पासून या प्रकल्पाच्या कामासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच येत्या काही महिन्यात या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. सध्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

याला मंजुरी मिळताच आता पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील एक राज्यमार्ग आणि एक राष्ट्रीय महामार्ग जोडला जाणार आहे. या पुलामुळे वाघोली राहू-रस्ता (राज्‍य मार्ग 68) व उरुळीकांचन व पुणे-सोलापूर रस्ता (राष्ट्रीय महामार्ग 9) एकमेकांना जोडले जाणार आहेत.

शिवाय प्रमुख जिल्‍हा मार्ग 138 वरील हवेली तालुक्यातील शिंदेवाडी, लबडेवस्ती, राऊत वस्ती, सहजपूर वाडी, लोणकरवाडी, पाटील वस्ती, साळुंखे वस्ती ही गावे सुद्धा जोडली जाणार आहेत अन याचा या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या भागातील नागरिकांना या पूलामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे या पूलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले पाहिजे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News