पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार चालना ! ‘या’ 8 ठिकाणी विकसित होणार रोपवे

खरे तर केंद्रातील सरकार पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सरकार स्थापित केल्यानंतर सातत्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. साहजिकच पर्यटन स्थळांवर रोपवे विकसित झाल्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ सुद्धा वाढणार आहे आणि याचा फायदा म्हणजेच पुणे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला, पर्यटनाला याचा मोठा फायदा होणार आहे.

Published on -

Pune News : पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आठ पिकनिक स्पॉटवर रोपवे विकसित केले जाणार आहेत. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार असून जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला ही गोष्ट नक्कीच पूरक ठरणार आहे.

खरे तर केंद्रातील सरकार पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सरकार स्थापित केल्यानंतर सातत्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

याच निर्णयाचा एक भाग म्हणून पर्वतमाला योजनेअंतर्गत देशातील विविध भागांमधील गडकिल्ल्यांचा आणि पर्यटन स्थळांचा विकास केला जात आहे त्यांचे संवर्धन करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. याच योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आठ प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

यासाठी या संबंधित आठ पर्यटन स्थळांवर रोपवे म्हणजेच रज्जूमार्ग तयार होणार आहे. साहजिकच पर्यटन स्थळांवर रोपवे विकसित झाल्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ सुद्धा वाढणार आहे आणि याचा फायदा म्हणजेच पुणे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला, पर्यटनाला याचा मोठा फायदा होणार आहे.

कुठे विकसित होणारं रोपवे

पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर रोपवे तयार होणार आहेत. खंडोबा निमगाव, सिंहगड, जेजुरी, राजगड, शिवनेरी, लेण्याद्री, दा-या घाट, भिमाशंकर या लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर रोपवेचे काम हाती घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील तीन आणि खेड तालुक्यातील दोन व अन्य तीन अशा एकूण 8 पर्यटन स्थळांवर रोप वे सुविधा करण्यात येणार आहे. यात खेड तालुक्यातील खंडोबा निमगाव, भीमाशंकर, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, लेण्याद्री आणि दाऱ्या घाट, पुणे तालुक्यातील सिंहगड, पुरंदर तालुक्यातील जेजुरी, वेल्हा तालुक्यातील राजगड या ठिकाणी रोपवे तयार केला जाणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने या संबंधित रोपवे प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पांना मान्यता मिळाली असल्याचा अध्यादेश सुद्धा शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र शासनाच्या ‘पर्वतमाला योजनेंतर्गत राज्यातील रोपवेची कामे राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) मार्फत कार्यान्वित करण्यास राज्य शासन सहकार्य करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील या रोप वे प्रकल्पांना जी जागा लागणार आहे त्यासाठी शासनाकडून दोन पर्याय समोर आणले गेले आहेत.

या पर्यायानुसार जर या संबंधित रोपवे प्रकल्पांना आवश्यक असणारी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असेल तर ही जागा 30 वर्षांच्या भाडेपट्टीवर NHLML ला देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या पर्यायानुसार संबंधित जागा सरकारी, खाजगी जागा असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत भूसंपादन करून संबंधित कंपनीला देण्यात येणार आहे.

एकंदरीत आगामी काळात पुणे जिल्ह्यातील या संबंधित आठ पर्यटन स्थळांवर रज्जू मार्ग विकसित होणार असून याचा फायदा म्हणून या संबंधित पर्यटन स्थळांचा आणि आजूबाजूच्या परिसराचा विकास सुनिश्चित होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe