पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील पाणी पुरवठा 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

Published on -

Pune News : पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील काही भागांमधील पाणीपुरवठा उद्या 30 ऑक्टोबर 2025 रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या संपूर्ण पुण्यात वेगवेगळी विकास कामे सुरू आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी शहरात ठिकठिकाणी उड्डाणपुले तयार केले जात आहेत.

अनेक रस्त्यांची आणि मेट्रोची कामे देखील शहरात युद्ध पातळीवर सुरू आहेत. याच विकास कामांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना काही अडचणींचा सुद्धा सामना करावा लागत आहे. कारण की मेट्रोच्या कामामुळे पिंपरी चिंचवड मधील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना तात्पुरता त्रास सहन करावा लागणार आहे.

त्याचवेळी पुण्यातील जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही भागांमधील पाणीपुरवठा उद्या 30 ऑक्टोबर रोजी खंडित राहणार अशी माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे.

पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्त केली जाणार असल्याने पुण्यातील काही भागांमधील पाणीपुरवठा 30 ऑक्टोबर रोजी खंडित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

त्याचवेळी निगडी परिसरातील मेट्रो कामाशी संबंधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याने उद्या पिंपरी चिंचवड मधील काही भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आता आपण पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड मधील कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहील याची माहिती पाहूयात.

पुण्यातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद 

रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, फुरसुंगी, उरूळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, बेकर हिल टाकी, खराडी भाग, आपले घर,

भानगाई वस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पठारे नगर, सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदननगर, बोराटेनगर, यशवंतनगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, माळवाडी, महावीरनगर, शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाढेश्वरनगर, मारूतीनगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटेनगर, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी.

पिंपरी चिंचवड मधील कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार 

नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी तसेच चिखली येथील हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News