पुणे शहरातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्ग सुरू होण्यास आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार ! कसा आहे नव्या मार्गाचा रूट ?

पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज येथे रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो धावत असून या मेट्रो मार्गांना पुणेकरांच्या माध्यमातून अद्भुत प्रतिसाद सुद्धा मिळतोय. दरम्यान, पुणेकरांना लवकरच तिसऱ्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार असून शहरातील तिसऱ्या मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. 

Published on -

Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुण्यातील वाहतूक कोंडी ही शहरातील एक भीषण समस्या बनलेली आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. यामुळे शहरात विविध रस्ते विकासाची आणि रेल्वेची कामे प्रस्तावित आहेत.

पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम बनवण्यासाठी पी एम पी एल च्या बसेस आणि मेट्रो देखील सुरू आहे. दरम्यान पुणे मेट्रो संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे. खरंतर, पुणे शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो धावत आहे. महत्वाचे म्हणजे या महा मेट्रो कडून सुरू करण्यात आलेल्या दोन्ही मेट्रो मार्गांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.

त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला असून या भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. दरम्यान आता शहरातील तिसऱ्या मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत म्हणजेच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

खरतर हा प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकल्पाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र असे असले तरी हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी आणखी एक वर्ष तरी वाट पहावी लागणार आहे.

 कधी सुरू होणार हा मेट्रो मार्ग

 पुणे तसेच पिंपरी चिंचवड मधील नागरिक आणि हिंजवडी मध्ये कामाला जाणाऱ्या आयआयटी कर्मचारी यांच्यासाठी महत्त्वाचा असा हा मेट्रो मार्ग नेहमीच चर्चेत राहतो. कारण असे की पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाला आयटी हब म्हणून ओळख प्राप्त असणाऱ्या हिंजवडी सोबत या मेट्रो मार्गामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि याचा हजारो कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 85 टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर मध्ये मेट्रोची ट्रॅक वर टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे. मात्र यासाठी अजूनही 10 – 11 महिने लागू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार हा मेट्रो मार्ग प्रत्यक्षात पुणेकरांच्या सेवेत येण्यासाठी मार्च 2026 पर्यंत वाट पहावी लागू शकते.

कसा आहे हा मेट्रो मार्ग प्रकल्प

शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर हा शहरातील तिसरा मेट्रो मार्ग प्रकल्प. याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे.

हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर राबवला जातोय. सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवण्यात येणारा हा पुण्यातील पहिलाच मेट्रो प्रकल्प असून या प्रकल्पाच्या कामाला 2021 मध्ये सुरुवात करण्यात आली.

तर 2022 मध्ये या मेट्रो मार्गाचा पहिला खांब उभा राहिला. हा मेट्रोमार्ग 23.3 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर एकूण 23 स्टेशन विकसित केली जाणार आहेत. या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी मेट्रोचे दोन सेट आधीच इथं पोहचले आहेत.

सध्या या दोन मेट्रो सेटची तांत्रिक चाचणी सुरू आहे. मात्र या मेट्रो सेटची प्रत्यक्षात रुळावर चाचणी होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडणार आहे. एकंदरीत शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या या मेट्रो मार्ग तीनच्या कामाला थोडासा विलंब होत असून हा मेट्रो मार्ग पुढील वर्षीच सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News