पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन नव्या महामार्गांची कामे सुरू होणार, ‘या’ कंपनीला मिळाला कॉन्ट्रॅक्ट

Published on -

Pune News : नवीन वर्ष सुरू होऊन एका आठवड्याचा काळ उलटला आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

खरे तर 14 जानेवारी रोजी संबंध देशभरात मकर संक्रांतीचा मोठा सण साजरा होणार असून मकर संक्रांतीच्या आधीच पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्यावर्षी मंजुरी मिळालेल्या पुणे जिल्ह्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

हे महत्त्वाचे प्रकल्प मागील वर्षी मंजूर झालेत आणि यावर्षी लगेचच यांचे काम सुरू होणार आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेर घर पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

दरम्यान हीच कायमस्वरूपी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे.

हे दोन्ही प्रकल्प पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी आणि वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून शहरातील तसेच शहराबाहेरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) तर्फे पुणे जिल्ह्यातील हडपसर–यवत मार्गाचा सहापदरी उड्डाणपूल आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे दोन्ही प्रकल्प गेल्या वर्षीच मंजूर झाले आहेत.

नागपूर येथे गेल्या महिन्यात संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील एका सुधारित प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी हडपसर–यवत मार्गाच्या वाढीला मंजुरी देण्यात आली असल्याची मोठी घोषणा केली. या प्रकल्पांतर्गत हडपसरमधील भैरोबा नाळा ते यवत दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

पुणे–सोलापूर महामार्गावर होणारी तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या उड्डाणपुलाला जून 2025 मध्ये मंजुरी देण्यात आली होती.

सुरुवातीला मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यात आता वाढ करण्यात आली असून, उड्डाणपुलाची लांबी सुमारे 4.5 किलोमीटरने वाढवण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 5,262 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सोलापूर दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

यासोबतच तळेगाव–चाकण–शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548डीच्या कामालाही याच वर्षात सुरुवात होणार आहे. औद्योगिक, मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

एकूण 53.2 किलोमीटर लांबीच्या या महामार्गापैकी 24.2 किलोमीटरचा भाग उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग असणार असून, काम दोन टप्प्यांमध्ये केले जाणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांना गेल्या वर्षी मंजुरी मिळाली असून सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संबंधित प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, अंतिम मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

MSIDC कडून सर्व नियोजन पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रकल्पांचे कंत्राट मोंटेकार्लो लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News