Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा आहे. खरे तर पुण्यात विविध शैक्षणिक संस्था अस्तित्वात आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील नामांकित विद्यापीठ सुद्धा याच ठिकाणी आहे. तसेच पुण्याला स्पर्धा परीक्षांचे केंद्र म्हणूनही ओळखतात. या ठिकाणी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

यूपीएससीच्या तयारीसाठी जसे राष्ट्र राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांची तुंबळ गर्दी पाहायला मिळते तशीच गर्दी एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आपल्या पुण्यात पाहायला मिळते. शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येथे एकवटतात.
सोबतच अलीकडे विविध आयटी कंपन्यांनी पुण्यातील हिंजवडी परिसरात आपले बस्तान बसवलेले आहे. पुण्यात वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती स्थापित होत आहेत. यामुळे हैदराबाद, बंगलोर नंतर पुण्यातही अनेक जण कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत.
इथे व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्यांची संख्या सुद्धा फारच उल्लेखनीय आहे. परिणामी पुण्यात सातत्याने घराची मागणी वाढत आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही घरांच्या किमती आता नवनवीन आलेख तयार करत आहेत. हे शहर मुंबई दिल्ली बेंगलोर हैदराबाद प्रमाणेच मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
म्हणून इथं अनेक उच्चभ्रू परिसर सुद्धा डेव्हलप झालेले आहेत आहेत. या पॉश परिसरात अनेक श्रीमंत लोक वास्तव्याला आहेत. पुणे शहरातील काही भागातील घरांच्या किमती सहाजिकच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच्या आहेत.
पण पुण्यात असेही काही भाग आहेत जे की सर्वसामान्यांसाठी परवडणारे आहेत. पुण्यातील काही भागांमध्ये आजही घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. दरम्यान आज आपण पुण्यातील अशाच टॉप 10 ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत.
हे आहेत पुण्यातील टॉप 10 स्वस्त ठिकाण
भोसरी : पुण्यातील एक प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र म्हणून भोसरीला ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला अनेक नामांकित कंपन्या पाहायला मिळतील. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती सुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भागातील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेट मधील आहेत. कमी किमतीत तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे असेल तर तुम्ही या ठिकाणी वास्तव्याला येऊ शकता.
लोहेगाव : लोहेगाव विमानतळा जवळील परिसर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे. या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध आहेत. पुणे नगर आणि पुणे सोलापूर या महामार्गामुळे हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागासोबत जोडला गेलेला आहे.
वाघोली : हा परिसर सुद्धा परवडणाऱ्या घरांसाठी ओळखला जातो. या परिसरात तुम्हाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे – नगर महामार्गाने हा सुद्धा परिसर जोडला गेलेला आहे.
चाकण : पुण्यात बजेटमध्ये घर हव आहे का मग तुमच्यासाठी चाकणचा पर्याय बेस्ट राहणार आहे. नाशिक पुणे एक्सप्रेस वे ला लागून असणारा हा परिसर सर्वसामान्यांसाठी परवडणारा आहे. हा पश्चिम पुण्यातील एक महत्वाचा परिसर आहे.
खराडी : पुण्याच्या पूर्वेकडील भागात स्वतःचे घर करायचे असेल तेही बजेटमध्ये घर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी खराडी हा भाग फायद्याचा राहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कमी दरात घरे मिळतील.
भुगाव : मुंबई पुणे एक्सप्रेस वे जवळील भुगाव हे ठिकाण देखील परवडणाऱ्या घरांसाठी ओळखले जाते. तुम्हालाही स्वस्तात घर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी घर घेऊ शकता.
वारजे : वारजे परिसरात तुम्हाला परवडणारी घरे मिळणार आहेत. या ठिकाणी घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत यामुळे अनेकजण येथे घर खरेदी करण्याला प्राधान्य दाखवतात. वारजे हे मुठा नदीच्या काठावर वसलेले शहरातील मध्यवर्ती भागापासून अगदी जवळ असणारे ठिकाण आहे.
धनकवडी : धनकवडी मध्ये अनेक सर्वोत्तम कॉलेजेस आहेत. या भागात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. राष्ट्रीय महामार्ग 4 जवळील हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी परवडणारे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वस्त दरात भाड्याने फ्लॅट्स उपलब्ध आहेत.
हिंजवडी : पुण्याची आयटी हब ही ओळख ज्या परिसरामुळे आहे तेच हे हिंजवडी. हिंजवडी मध्ये बेंगलोर आणि हैदराबाद प्रमाणेच आयटी कंपन्या पाहायला मिळतात. तुम्हाला शेअरिंगने भाड्यावर फ्लॅट घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हिंजवडी हे ठिकाण फायद्याच राहणार आहे. जर तुम्ही हिंजवडी मधील कंपन्यांमध्ये काम करत असाल तर नक्कीच हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते.
कात्रज : कात्रज हे ठिकाण देखील राष्ट्रीय महामार्ग चार जवळील आहे. हा महामार्ग कोल्हापूर आणि बेंगलोरला जोडतो. या ठिकाणीही तुम्हाला स्वस्तात परवडणारी घर उपलब्ध होतात.