Pune Property News : पुणे शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पुण्यात देश विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक आहे.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमधील विद्यार्थी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात. सोबतच येथे आयटी कंपन्या देखील फार मोठ्या प्रमाणात आहेत यामुळे येथे नोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे.

दरम्यान शिक्षण उद्योग नोकरी कोणत्याही कारण असो तुम्ही जर पुण्यात आला असाल आणि तुम्हाला स्वस्तात भाड्याने घर हवे असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामासाठी राहणार आहे. आज आपण पुण्यात खिशाला परवडणाऱ्या किमतीत भाड्याची घरे कुठे उपलब्ध होणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
स्वस्तात भाड्याची घर कुठे मिळणार
कात्रज – तुम्हाला स्वस्तात भाड्याचे घर हवे असेल तर तुमच्यासाठी कात्रज चा पर्याय भेट राहणार आहे. येथे वन बीएचके घरासाठी साधारणता साडेसात हजार रुपयांपासून ते साडेआठ हजार रुपयांपर्यंत भाडे भरावे लागेल. तसेच टू बीएचके घरांसाठी आठ ते पंधरा हजार रुपये भाडे लागेल. शिवाय तीन बीएचके घर हवे असेल तर 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत भाडं भराव लागू शकत.
लोहगाव – हा परिसर पुणे अहमदनगर महामार्ग आणि पुणे सोलापूर महामार्गाने कनेक्ट झालेला आहे. यामुळे अनेकजण येथे घर शोधतात. तुम्हाला पण या भागात भाड्याचे घर हवे असेल तर तुम्हाला साधारणता पाच हजार रुपयांपासून भाड्याचे घर मिळणार आहे. येथे घरांसाठी पाच हजार रुपये ते 25 हजार रुपये प्रति महिना एवढे भाडे द्यावे लागते.
चाकण – अनेक जण चाकण एमआयडीसी मध्ये कामाला असतील. दरम्यान जर तुम्ही ही चाकण एमआयडीसी मध्ये काम शोधले असेल आणि तुम्हाला भाड्याने फ्लॅट हवा असेल तर येथे तुम्हाला वन बीएचके घरासाठी साधारणता पाच ते दहा हजार रुपये एवढे भाडे द्यावे लागू शकते. तसेच येथे टू बीएचके घरासाठी साधारणतः दहा ते वीस हजार रुपये एवढे भाडे भरावे लागते.
धनकवडी – हा भाग पण पुण्यातील एक वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात वन बीएचके घरांसाठी 6000 ते 15 हजार रुपये एवढे भाडे भरावे लागू शकते. तसेच टू बीएचके घरासाठी 15 ते 25 हजार रुपये भाडे भरावे लागू शकते.
वारजे – या भागात वन बीएचके घरासाठी 11 ते 16 हजार रुपये एवढे भाडे द्यावे लागू शकते. टू बीएचके घरासाठी 15 ते 25 हजार रुपये एवढे भाडे भरावे लागू शकते.













