Pune Railway : तीन ऑगस्ट पासून पुणे ते नागपूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. कारण की रेल्वे प्रशासनाकडून लवकरच एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी रेल्वे कडून आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे ते मध्य प्रदेशातील रिवादरम्यान ही नवीन एक्सप्रेस चालवली जाणार आहे. या गाडीची सुरुवात तीन ऑगस्ट पासून होईल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर या गाडीचे लोकार्पण होणार आहे. यामुळे पुणे ते रीवा या दरम्यानचा प्रवास वेगवान होईल. ही गाडी नागपूर मार्गे धावणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीला अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर आणि कोपरगाव या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा सुद्धा मंजूर झाला आहे.
म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा पुण्याकडील आणि नागपूर अन मध्यप्रदेशकडील प्रवास वेगवान होणार आहे. अशा स्थितीत, आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक अन थांबे याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
कसे राहणार वेळापत्रक ?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी 15.15 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी 17.30 वाजता रीवा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात रीवा पुणे एक्सप्रेस दर बुधवारी सहा वाजून 45 मिनिटांनी रिवा रेल्वे स्थानकातून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पावणेदहा वाजता ही गाडी पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?
ही नवीन रेल्वे गाडी पुणेकरांसाठी तर फायद्याची राहणारच आहे याशिवाय या गाडीचा अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे. या गाडीला महाराष्ट्रातील तब्बल आठ महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ही गाडी राज्यातील दौंड, अहिल्या नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया या आठ स्थानकांवर थांबा घेणार आहे. त्यामुळे या संबंधित भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ही गाडी राज्याचे दळणवळण आणखी सक्षम बनवणार आहे.