पुण्यातून कोकणातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! 15 रेल्वे स्थानकावर थांबणार

पुणे - रत्नागिरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे कडून नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही गाडी पुढील महिन्यात सुरू करण्यात येईल अशी माहिती रेल्वेने दिली आहे. 

Published on -

Pune Railway News : पुण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी साप्ताहिक गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी अशा दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

या दोन्ही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत आणि या गाड्यांच्या एकूण बारा फेऱ्या होणार आहेत. रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या दोन्ही विशेष गाड्या गणेशोत्सवाच्या काळात पुणे ते रत्नागिरी दरम्यान धावणार आहेत. म्हणूनच आता आपण या दोन्ही विशेष गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेऊयात.

पुणे – रत्नागिरी नॉन एसी साप्ताहिक विशेष गाडीचे वेळापत्रक 

पुणे – रत्नागिरी नॉन एसी साप्ताहिक विशेष गाडी 23 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2025 या कालावधीत दर शनिवारी पुणे रेल्वे स्थानकावरून मध्यरात्री बारा वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरी स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरी स्थानकातून सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. अर्थातच पुणे – रत्नागिरी नॉन एसी साप्ताहिक विशेष गाडीच्या पुणे ते रत्नागिरी दरम्यान तीन आणि रत्नागिरी ते पुणे दरम्यान तीन अशा एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.

पुणे – रत्नागिरी एसी साप्ताहिक विशेष गाडीचे वेळापत्रक कसे असणार?

पुणे – रत्नागिरी एसी साप्ताहिक विशेष गाडी 26 ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर 2025 या कालावधीत दर मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरून मध्यरात्री बारा वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात रत्नागिरी – पुणे एसी साप्ताहिक विशेष गाडी या कालावधीत दर मंगळवारी रत्नागिरी येथून सायंकाळी 5:50 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. अर्थातच पुणे – रत्नागिरी एसी साप्ताहिक विशेष गाडीच्या या कालावधीत एकूण 6 फेऱ्या होणार आहेत.

कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष गाडी ?

रत्नागिरी ते पुणे दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एसी आणि नॉन एसी विशेष गाडीला संगमेश्वर रोड, अरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, करंजाडी, वीर, माणगाव, रोहा, पेन, पनवेल, कल्याण, लोणावळा, तळेगाव आणि चिंचवड या 15 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!