पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या Railway Station वर थांबा मिळणार ? वाचा सविस्तर

अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाने पुण्याहून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पुणे ते करीमनगर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे. या एक्सप्रेस ट्रेन मुळे पुणेकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

Published on -

Pune Railway News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीसाठी अर्थातच पुण्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, येत्या काही दिवसांनी दसरा दिवाळीचा मोठा सण येणार आहे. नवरात्र उत्सव, विजयादशमी अन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाने पुण्याहून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पुणे ते करीमनगर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे. या एक्सप्रेस ट्रेन मुळे पुणेकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा देऊ शकते या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पुणे-करीमनगर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार बर ?

पुणे-करिमनगर-पुणे (०१४५१/५२) या विशेष साप्ताहिक रेल्वेच्या आठ फेऱ्या होणार आहेत. पुणे ते करीमनगर अशा चार आणि करीमनगर ते पुणे अशा चार फेऱ्या होणार आहेत.

पुणे-करिमनगर ही रेल्वे २१ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर अन ११ नोव्हेंबरला पुणे येथून रवाना होणार आहे. ही गाडी या दिवशी रात्री १०.४५ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वरून रवाना होईल आणि करिमनगर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोहचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही विशेष एक्सप्रेस 23 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला करीमनगर येथून रवाना होणार आहे. ही विशेष रेल्वे करीमनगर येथून रवाना झाल्यानंतर पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पोहोचणार आहे.

ही विशेष एक्सप्रेस ट्रेन मराठवाड्यातील नांदेड रेल्वे रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे. त्यामुळे पुण्यावरून मराठवाड्यात जाणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय नांदेडसहित संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला या ट्रेनमुळे जलद गतीने पुण्यात पोहोचता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe