पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मराठवाड्यातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कधीपासून सुरू होणार, कस राहणार वेळापत्रक ?

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन हडपसर ते लातूर अशी नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार असून या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे सणासुदीच्या काळात होणाऱ्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल असा आशावाद प्रशासनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Railway News

Pune Railway News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्याहून मराठवाड्यात आणि मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर मराठवाड्यातून पुण्याला ये जा करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.

सणासुदीच्या काळात ही संख्या आणखी वाढत असते. दिवाळी सारख्या मोठ्या सणांमध्ये या मार्गावर धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या काळात अनेकांना रेल्वेचे तिकीट सुद्धा मिळत नाही.

हेच कारण आहे की रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते मराठवाड्यातील लातूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन हडपसर ते लातूर अशी नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार असून या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे सणासुदीच्या काळात होणाऱ्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल असा आशावाद प्रशासनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान आज आपण हडपसर ते लातूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक नेमके कसे राहील यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार हडपसर-लातूर विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक ?

ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर यादरम्यान चालवली जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या काळात ही गाडी दर सोमवार, मंगळवार, बुधवार तसेच शुक्रवारी चालवली जाणार आहे. ही ट्रेन लातूर इथून सकाळी साडेनऊ वाजता रवाना होणार आहे आणि हडपसरला संध्याकाळी तीन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे.

तसेच, ही दिवाळी विशेष गाडी हडपसर इथून सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि लातूरला नऊ वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे. या ट्रेनमुळे पुणे ते लातूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही विशेष एक्सप्रेस ट्रेन हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डूवाडी, जेऊर आणि दौंड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा घेणार आहे. खरे तर ही गाडी लिमिटेड टाइम पिरेड साठी सुरू करण्यात आली आहे. मात्र जर या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला तर आगामी काळात ही विशेष एक्सप्रेस ट्रेन कायम केली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe