पुण्याहुन लवकरच सुरु होणार एक विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक ? कोणत्या शहरातील नागरिकांना मिळणार फायदा ?

रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छठ पूजेच्या कालावधीत घोषित केलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक सुद्धा जारी केले आहे. या वेळापत्रकानुसार, पुणे-गोरखपूर (गाडी क्रमांक - ०१४३१) ही रेल्वे २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे.

Published on -

Pune Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्याहून उत्तर भारतात प्रवास करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरे तर पुण्यात उत्तर भारतातील हजारो नागरिक कामाला आले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात उत्तर भारतातील लोक मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी आले आहेत.

यामुळे सणासुदीच्या काळात मुंबई, पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या नेहमीच वाढत असते. प्रामुख्याने दिवाळी आणि छठ पूजेच्या कालावधीत ही संख्या दुपटीने वाढते.

यंदाही दिवाळीच्या कालावधीत आणि छठ पूजेला उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रशासनाने पुणे ते गोरखपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे

यामुळे पुण्याहून उत्तर प्रदेशला प्रामुख्याने गोरखपुरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहे वेळापत्रक?

रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छठ पूजेच्या कालावधीत घोषित केलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक सुद्धा जारी केले आहे. या वेळापत्रकानुसार, पुणे-गोरखपूर (गाडी क्रमांक – ०१४३१) ही रेल्वे २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी सोडली जाणार आहे अन गोरखपूरला दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच गोरखपूर-पुणे (गाडी क्रमांक – ०१४३२) ही रेल्वे २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सोडली जाणार आहे अन पुण्याला तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मनकापूर जंक्शन, बस्ती आणि खलीलाबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!