पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Published on -

Pune Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला कनेक्टिव्हिटी देणार आहे.

पुण्याहून विदर्भाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे–नागपूर या व्यस्त मार्गावर वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मर्यादित कालावधीसाठी धावणार असून एकूण सहा फेऱ्या पूर्ण करतील. यामुळे सणासुदीच्या काळात आणि हिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर तसेच विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पहिली गाडी ०१४०१ पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष १९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी पुणे स्थानकावरून रात्री ०८:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०२:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील.

यास प्रत्युत्तर म्हणून ०१४०२ नागपूर–पुणे साप्ताहिक विशेष २० डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान दर शनिवारी धावणार आहे. नागपूरहून ही गाडी दुपारी ०४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीच्या देखील तीन फेऱ्या राहतील.

या विशेष गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी विस्तृत मार्गावर थांबे देण्यात आले आहेत. यात दौंड कॉर्ड लाईनवरील स्थानकासह अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना या सेवांमुळे थेट लाभ होणार आहे.

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन गाड्यांची डब्यांची रचना देखील वाढविण्यात आली आहे. दोन्ही विशेष गाड्यांमध्ये चार एसी-३ टायर, आठ स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास, तसेच दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील. ही रचना सर्व वर्गातील प्रवाशांना आरामदायी आणि परवडणारी सेवा प्रदान करणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सणासुदीच्या कालावधीत नागपूर–पुणे मार्गावरील तिकिटे सहसा लवकर संपतात. अशा वेळी विशेष गाड्यांचे नियोजन केल्याने अतिरिक्त मागणी पूर्ण होण्यास मदत मिळेल. हिवाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्व प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.

या तात्पुरत्या सेवांसाठी आरक्षण सुरू झाले असून प्रवाशांनी तिकिटे वेळेत बुक करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe