Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दिल्ली ते गोवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस ट्रेन आता पुणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
पुणे ते कोल्हापूर या महत्त्वपूर्ण लोहमार्गावरील पुणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ला थांबा मंजूर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

जेजुरी रेल्वेस्थानकात हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची अति जलद रेल्वे थांबा घेणार आहे अन त्यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात हे लांब पल्ल्याची अति जलद रेल्वे गाडी अल्पवेळ थांबणार आहे. तसेच सध्या कोल्हापूर ते पुणे धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून मुंबईपर्यंत धावणार आहे.
खरे तर सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई अशीच धावत होती मात्र कोरोना काळापासून ही रेल्वे काही काळासाठी बंद करण्यात आली, पुढे ही रेल्वे सुरू झाली पण फक्त पुण्यापर्यंत धावू लागली आणि आता पुढील महिन्यापासून ही रेल्वे पुन्हा एकदा मुंबईपर्यंत धावणार आहे.
दिल्ली गोवा एक्सप्रेस जेजुरीत थांबणार असल्याने प्रवाशांना दिलासा
खरेतर, जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण औद्योगिक वसाहतीचे महत्त्वपूर्ण शहर आहे. हे तीर्थक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या रेल्वे स्थानकापासून केवळ 14 कि.मी. अंतरावर अष्टविनायकातील पहिले स्थान मोरगाव सुद्धा आहे.
दरम्यान, जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, गुजरात येथून भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. या मार्गावरून वंदे भारत, दिल्ली-गोवा, जोधपूर-मंगळुरू, कोल्हापूर-अहमदाबाद, महालक्ष्मी, लोकमान्यनगर-हुबळी, यशवंतपूर-हुबळी अशा अनेक लांब पल्ल्याच्या अतिजलद रेल्वेगाड्या धावतात.
मात्र, जेजुरीत थांबा नसल्याने भाविक-भक्त व औद्योगिक वसाहतीमधील कामगारवर्गाची गैरसोय होत आहे. हेच कारण आहे की लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा मिळायला हवा अशी मागणी होती.
दरम्यान आता याच मागणीच्या अनुषंगाने दिल्ली ते गोवा दरम्यान धावणारी एक्सप्रेस ट्रेन या ठिकाणी थांबणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे.