महाराष्ट्राला लवकरच मिळणार नवीन Railway मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले पूर्ण, 90 मिनिटांचा वेळ वाचणार

Pune Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा प्रकल्प सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा 60 मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचा दावा केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 280 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुणे ते मिरज असा हा रेल्वे मार्ग प्रकल्प असून लवकरच मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीचा वेग वाढणार आहे.

खरंतर नऊ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. सातारा कोरेगाव रहिमतपूर ते तारेगाव अशा 33 ते 34 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे काम अपूर्ण राहिलेले होते जे की नुकतेच पूर्ण झाले असून यामुळे पुणे ते मिरज सात प्रवास वेगवान होणार आहे.

या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गांवर रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे तसेच रेल्वे गाड्यांचा वेग पण वाढणार आहे. दरम्यान या रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्याने आता पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस थेट मुंबईपर्यंत चालवली जाईल असा विश्वास प्रवाशांकडून व्यक्त केला जातोय.

या दुहेरीकरण प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पुणे ते मिरज हा प्रवास वेगवान होणार आहे. सद्यस्थितीला पुणे ते कोल्हापूर असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना जवळपास साडेसात तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय.

मात्र दुहेरीकरण प्रकल्प पूर्ण झालेला असल्याने आता हा प्रवासाचा कालावधी सहा तासांवर येणार आहे म्हणजेच प्रवाशांचा जवळपास 90 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

या मार्गावर रेल्वे क्रॉसिंगसाठी गाड्यांना 15 ते 40 मिनिटे थांबावे लागते पण आता दुहेरीकरणाच्या प्रकल्पामुळे हा वेळ कमी होणार आहे. रेल्वे क्रॉसिंग साठी कमी वेळ लागला तर सहाजिकच प्रवासाचा कालावधी सुद्धा कमी होणार आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत असून आता दुहेरीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाला असल्याने येत्या काळात या मार्गावर वंदे भारत ट्रेन प्रत्यक्षात धावताना दिसणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवासी संघटनांनी देखील कोल्हापूर मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची गरज अधोरेखित केली असून दुहेरीकरण प्रकल्पानंतर तरी ही गाडी सुरू होईल अशी अपेक्षा पण यावेळी व्यक्त केली आहे.