Pune Railway स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! प्रवासाआधी एकदा वाचाच

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे विभागाच्या माध्यमातून पुणे रेल्वे स्थानकावरून सोडल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर, एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे आणि तापमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यामुळे उकाड्याने नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत. दरम्यान एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे तर दुसरीकडे पुणे रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली आहे.

कारण की, पुणे आणि हावडा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. बिलासपूर रेल्वे विभागात कनेक्टिव्हिटीच्या कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकावरून चालवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

खरे तर, येत्या काही दिवसांनी संपूर्ण देशभरात उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. दरम्यान, याच गर्दीच्या कालावधीत आता पुणे रेल्वे स्थानकावरून चालवल्या जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने याचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक तर कोलमडणार आहेच शिवाय ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना मोठी अडचण जाणवणार आहे. दरम्यान आता आपण रेल्वेने नेमक्या कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत.

या रेल्वे गाड्या राहणार रद्द

बिलासपूर विभागातील रायगड-झारसुगुंडा जंक्शन येथे कोटारलिया स्थानकावरील चौथ्या मार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी हे काम 11 एप्रिलपासून 23 एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. या कालावधीत काही रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यात विशेषतः पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस आणि पुणे-संत्रागाची एक्सप्रेस यांचा समावेश आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, संत्रागाची-पुणे एक्सप्रेस 12 आणि 19 एप्रिलला, पुणे-संत्रागाची एक्सप्रेस 14 आणि 21 एप्रिलला, पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस आणि हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस 11 ते 24 एप्रिल दरम्यान, तर हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस 10, 12, 17 आणि 19 एप्रिलला आणि पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस 12, 14, 19 आणि 21 एप्रिलला रद्द करण्यात आली आहे.

म्हणून आता प्रवाशांनी या बदलांचा विचार करून आपली यात्रा नियोजनबद्ध करावी, अन्यथा त्यांना तिकीट रद्द करण्याची वेळ येऊ शकते. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या या सूचनेमुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा विचार करणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe