पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! शहरातील ‘या’ महत्वाच्या मेट्रो मार्गाच्या कामाला गती, कधीपर्यंत पूर्ण होणार काम? वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Pune Railway News

Pune Railway News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. दरम्यान, शहरातील एका महत्त्वाच्या मेट्रोमार्गासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.

सध्या स्थितीला सुरू असणाऱ्या पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामा संदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या दोन प्रमुख स्थानकाच्या कामाला गती मिळाली आहे.

निगडी आणि आकुर्डी या दोन मेट्रोस्थानकाच्या कामाला कधीच सुरुवात झाली असून या स्थानकाच्या फाउंडेशनचे काम देखील पूर्ण झाले आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास पुन्हा व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान आता पुढच्या टप्प्यात चिंचवड येथील मेट्रोस्थानकाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो प्रशासनाने हा विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्प अडीच वर्षात पूर्ण करण्याचा मानस बोलून दाखवलाय.

खरंतर महा मेट्रो ने स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका दरम्यानचा मेट्रो मार्ग प्रकल्प नुकताच पूर्ण केलाय. सुरुवातीच्या टप्प्यात या मार्गाचे पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गाचे काम पूर्ण झाले होते.

नंतर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आणि हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला. म्हणजे आता पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा संपूर्ण मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे.

सध्या या मार्गावर वाहतूक सुरु असून या मार्गामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास हा जलद झाला आहे. दरम्यान, शासनाने हा मेट्रो मार्ग पुढे निगडी मधील भक्ती शक्ती चौकापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून याला नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती.

या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. या मेट्रो मार्गाला मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर महिन्यात या मार्गाच्या बांधकामासाठी ची निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचे बांधकाम सुरू झाले. दरम्यान आता या मार्गावरील दोन महत्त्वाच्या स्थानकाच्या कामांना सुरुवात झाली असून त्याच्या फाउंडेशन चे काम देखील पूर्ण झाले आहे.

या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि निगडीमधील भक्ती-शक्ती चौक हे चार स्थानके विकसित होणार आहेत. यापैकी आकुर्डी आणि निगडीमधील भक्ती शक्ती चौक या दोन स्थानकांच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे.

आता चिंचवड येथील स्‍थानकाच्‍या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासह सध्या निगडीपर्यंत पिलर उभारण्याच्‍या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे.

या कामांसाठी दोन्‍ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे हा मेट्रो मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणार आहे. येत्या अडीच वर्षात हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असे सांगितल जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe