पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, 23 ऑगस्टला धावणार पहिली गाडी

रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुण्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे कडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

Published on -

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर पुढील महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. खरे तर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यातून हजारो नागरिक कोकणात जात असतात.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे कडून विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

या विशेष गाड्यांच्या एकूण बारा फेऱ्या होणार आहेत. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणे ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

दरम्यान आता आपण या विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कसे राहणार विशेष गाडीचे वेळापत्रक ?

पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे (ट्रेन क्रमांक 01447/01448) सहा फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक 01447 23 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री बारा वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि रत्नागिरी येथे ही गाडी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.

तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01448 23 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता ही गाडी पोहोचणार आहे.

याशिवाय रेल्वे भागाकडून पुणे-रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेच्या म्हणजेच गाडी क्रमांक 01445 / 01446 च्या सहा फेऱ्या होणार आहेत.

या वातानुकूलित विशेष रेल्वे गाडीचे वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक 01445 26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री बारा वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे.

तसेच गाडी क्रमांक 01446 26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून दुपारी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि ही गाडी पुण्याला पहाटे पाच वाजता पोहोचणार आहे. 

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस 

मिळालेल्या माहितीनुसार या विशेष गाड्यांसाठी आज पासून आरक्षण सुरू होणार आहे. 24 जुलै 2025 पासून या विशेष गाड्यांसाठी आरक्षण करता येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे जर तुम्हालाही गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोकणात जायचे असेल तर तुम्हाला आत्तापासूनच या गाड्यांसाठी आरक्षण करावे लागणार आहे अन्यथा तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणे अशक्य आहे.

दरम्यान या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्या चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!