पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ दोन शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ?

पुणे ते दानापूर दरम्यान आणि पुणे ते मालदा टाउन यादरम्यान या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे पुण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान येत्या होळी सणाला देखील या मार्गांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे आणि याचमुळे या मार्गावर आता स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated on -

Pune Railway News : येत्या 14 तारखेला देशात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. पुण्यावरूनही दोन स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते दानापूर दरम्यान आणि पुणे ते मालदा टाउन यादरम्यान या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे पुण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी होळी सणाला या मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असते. या मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या सणासुदीच्या काळात हाऊसफुल होत असतात.

दरम्यान येत्या होळी सणाला देखील या मार्गांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे आणि याचमुळे या मार्गावर आता स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या दोन्ही विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पुणे दानापूर स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक कसं असणार?

पुणे-दानापूर-पुणे विशेष ट्रेन 11 मार्च 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ट्रेन क्रमांक 01419 पुणे येथून 19:55 वाजता सोडली जाईल आणि तिसऱ्या दिवशी 04:30 वाजता ही ट्रेन दानापूरला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 01420 13 मार्च 2025 रोजी दानापूर रेल्वे स्थानकावरून 06:30 वाजता सोडली जाणार आहे अन दुसर्‍या दिवशी 17:35 वाजता ही स्पेशल ट्रेन पुण्याला पोहचणार आहे.

या ट्रेनमुळे पुणे ते दानापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ही गाडी नक्कीच फायद्याचे ठरेल असा विश्वास व्यक्त होतोय.

पुणे-मालदा टाउन-पुणे विशेष ट्रेनच संपूर्ण वेळापत्रक

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे मालदा विशेष एक्सप्रेस ट्रेन 23 मार्च 2025 रोजी पुण्यातून सोडली जाणार आहे. या दिवशी ट्रेन क्रमांक 03426 ही स्पेशल गाडी 22:00 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सोडले जाणार आहे आणि ही स्पेशल ट्रेन तिसर्‍या दिवशी 16:30 वाजता मालदा टाउनला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ट्रेन क्रमांक 03425, 21 मार्च 2025 रोजी 17:30 वाजता मालदा शहरातुन रवाना होणार आहे अन तिसऱ्या दिवशी ही गाडी 11:35 वाजता पुण्यात पोहोचणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe