Pune Railway News : पुणे अहिल्यानगर तसेच कोपरगाव मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढते गर्दी लक्षात घेता रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या गाडीमुळे पुणे अहिल्या नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी पुणे ते रीवा दरम्यान धावणार आहे. ही नवीन ट्रेन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारी आहे. महत्त्वाची बाब अशी की, ही गाडी बालाघाट मार्गे गोंदिया आणि मग नागपूर व्हाया पुण्याला येणार आहे. दरम्यान आता आपण या नव्या एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नव्या गाडीचा रूट कसा असणार?
रीवा ते पुणे दरम्यान चालवली जाणारी एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे म्हणजेच साप्ताहिक राहणार आहे. ट्रेन क्रमांक 20152/20151 ही नवीन सेवा रीवा येथून सुटेल आणि सतना, कटनी, जबलपूर, नैनपूर,
बालाघाट आणि गोंदिया सारख्या प्रमुख स्थानकांमधून प्रवास करून नागपूरला पोहोचेल. नागपूरला आल्यानंतर ही गाडी पुढे पुण्याकडे जाईल. ही ट्रेन रेल्वे प्रवाशांसाठी दुहेरी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
रीवा ते पुणे दरम्यानच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर ही गाडी कनेक्टर म्हणून काम करणार आहे आणि पुणे ते नागपूर या मार्गावर असणाऱ्या गर्दीवर सुद्धा ही गाडी नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. या गाडीमुळे पुणे ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सुद्धा ही गाडी फायद्याची ठरेल.
वेळापत्रक कसे राहणार?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाडीचे वेळापत्रक कसे असणार? तर रेल्वेने सांगितल्याप्रमाणे गाडी क्रमांक 20152 रीवा रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी सकाळी पावणे सात वाजता ही गाडी रवाना होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ही गाडी नागपूरला पोहोचणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता ही गाडी पुण्यात पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक 20151 पुणे रेल्वे स्थानकावरून दर गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजता सोडली जाणार आहे आणि शुक्रवारी पहाटे पाच वाजून 25 मिनिटांनी ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे मग पुढे ही गाडी संध्याकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी रिवा रेल्वे स्थानकावर पोहोचेल.