पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन रेल्वे, कसा असणार रूट?

पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे ते इंदोर विशेष एक्सप्रेस ट्रेन बाबत रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. या विशेष गाडीला 26 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुणे ते इंदूर दरम्यान रेल्वे कडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जात असून आता याच एक विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे ते इंदोर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला फारच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून या गाडीमुळे पुणे ते इंदोर दरम्यानचा प्रवास वेगवान झाला आहे. हेच कारण आहे की आता रेल्वे कडून या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी आता आणखी काही काळ या मार्गावर सुरू राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ट्रेन क्रमांक 09324 इंदूर – पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन आधी 19 मार्च 2025 पर्यंत चालवली जाईल असे सांगितले गेले होते.

मात्र ही गाडी आता 26 मार्च 2025 ते 25 जून 2025 पर्यंत विस्तारित केली गेली आहे म्हणजेच ही गाडी 25 जून पर्यंत धावणार आहे. या काळात या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण 14 फेऱ्या होणार आहेत.

ही ट्रेन आठवड्यातून एक दिवस धावणार आहे म्हणजेच साप्ताहिक असेल. आधी या विशेष गाडीचे जे वेळापत्रक होते तेच वेळापत्रक या काळात सुद्धा कायम राहणार आहे. तसेच गाडी क्रमांक 09323 पुणे – इंदूर साप्ताहिक विशेष आता 26 जून पर्यंत चालवली जाणार आहे.

ही गाडी 20.03.2025 पर्यंत चालविण्यात येणार होती. मात्र प्रवाशांची वाढती मागणी पाहता या गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन आता प्रवाशांच्या सोयीसाठी 27.03.2025 ते 26.06.2025 या कालावधीत आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे.

या ट्रेनच्या देखील 14 फेऱ्या होणार आहेत. या विशेष ट्रेनच्या वेळापत्रकात सुद्धा कोणताच बदल झालेला नाही. या गाडीचे थांबे सुद्धा तेच राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

पुणे ते इंदोर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या इंदूर ते पुणे अशा 14 आणि पुणे ते इंदूर अशा 14 म्हणजेच एकूण 28 फेऱ्या होणार आहेत.

विशेष गाडी 09323/09324 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी आज, 26 मार्च 2025 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर तिकिट आरक्षण सुरू होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe