पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! जिल्ह्यातील ‘या’ 12 स्थानकांचा पुनर्विकास होणार, पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

पुणे जिल्ह्यातील पुणे जंक्शन, बारामती, शिवाजीनगर, लोणावळा, दौंड, केडगाव, आकुर्डी, चिंचवड, देहू रोड, तळेगाव, हडपसर आणि उरुळी या 12 स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी आवश्यक निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे.

Published on -

Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बारा स्थानकांचा अमृत भारत स्टेशन या शासनाच्या महत्त्वकांशी योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत संबंधित रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. खरेतर या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार असून या पुनर्विकासाच्या प्रकल्पामुळे संबंधित रेल्वे स्थानकांवर अनेक आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याच संदर्भात आता एक मोठी माहिती दिली आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्या रेल्वे स्थानकांचा विकास होणार आणि या संबंधित रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे? याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे.

अशा परिस्थितीत आता आपण पुणे जिल्ह्यातील बारा रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी किती कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे याबाबतचा आढावा घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

पुणे जिल्ह्यातील या बारा स्थानकांचा विकास होणार?

केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांशी योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, अंधेरी, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजी नगर अशा विविध स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पुण्यातील पुणे येथील रेल्वे स्थानकासोबतच बारामती सह अन्य दहा प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. पुणे जिल्ह्यातील पुणे जंक्शन, बारामती, शिवाजीनगर, लोणावळा, दौंड, केडगाव, आकुर्डी, चिंचवड, देहू रोड, तळेगाव, हडपसर आणि उरुळी या 12 स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.

या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची सुद्धा आता उपलब्धता करून देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी आवश्यक निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील बारामती या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 11 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दौंड रेल्वे स्थानकासाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केडगाव रेल्वे स्थानकासाठी 12 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

आकुर्डी रेल्वे स्थानकासाठी 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिंचवड वीस कोटी चाळीस लाख, देहूरोड आठ कोटी पाच लाख, तळेगाव चाळीस कोटी 34 लाख, हडपसर 25 कोटी आणि उरुळी रेल्वे स्थानकासाठी 13 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.

या योजनेत जी स्थानके समाविष्ट करण्यात आली आहे त्या स्थानकांवर एस्केलेटर, स्वच्छतागृह, लिफ्ट, कॅन्टीन, फूड कोर्ट अशा अनेक गोष्टी विकसित केल्या जाणार आहेत. या सर्व गोष्टी फारच आधुनिक राहतील आणि यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe