Pune Railway News : महाराष्ट्रातून दिल्ली किंवा गोवाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जे प्रवासी जेजुरी रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे किंवा गोव्याकडे प्रवास करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे. कारण की दिल्ली ते गोवा दरम्यान धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ट्रेनला आता जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.
खरे तर या रेल्वेस्थानकावरून अनेक जलद गतीच्या गाड्यात धावतात, मात्र कोणतीच गाडी येथे थांबत नाही, दरम्यान या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने जेजुरी रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच येथे उतरणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

जेजुरी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी खंडेरायाच्या दर्शनाला येणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. मात्र असे असतानाही अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रेल्वे स्थानकावरून धावूनहीं येथे थांबत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.
यामुळे या रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अति जलद लांब पल्याच्या गाड्यांना या ठिकाणी थांबा मंजूर झाला पाहिजे अशी मागणी प्रवासी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने रेल्वे कडे केली जात होती. दरम्यान याच मागणीच्या अनुषंगाने आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला असून दिल्ली ते गोवा दरम्यान धावणारी अति जलद रेल्वे आता पुण्यातील जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
याबाबत हालचाली सुरु झाल्या असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेजुरी रेल्वे स्थानकापासून खंडोबाचे मंदिर फक्त दोन ते अडिच किलोमीटर अंतरावर आहे. मात्र असे असतानाही जेजुरी स्थानकांवर रेल्वे थांबा घेत नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती.
भाविकांना रेल्वे जेजुरी स्थानकावर थांबा घेत नसल्याने खासगी वाहनाच्या मदतीने मंदिरापर्यंत जावे लागत असे. पण आता दिल्ली ते गोवा दरम्यान धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ट्रेन ला जेजुरी रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
रेल्वेने या गाडीला जेजुरीला थांबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा भाविकांना मोठा फायदा होणार आहे तसेच, अंतराची बचत होणार आहे. गोवा एक्सप्रेस जेजुरीला थांबल्यास या भागातील औद्योगिक क्षेत्राला देखील याचा मोठा लाभ होणार आहे.