Pune Railway News : सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून ख्यातनाम असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की, पुणे आणि नगर मधील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून एक नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नवीन रेल्वे गाडीमुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन एक्सप्रेस ट्रेन पुणे ते दानापुर दरम्यान चालवली जाणार आहे.

खरंतर, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेकजण आपल्या मूळ गावाकडे गेले होते आणि आता सुट्ट्या संपत आहेत त्यामुळे मूळ गावाकडून पुन्हा एकदा शहराकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अनेकांना तर तिकीटच मिळत नसल्याची वास्तविकता सुद्धा पाहायला मिळाली आहे.
याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आता रेल्वे कडून पुणे ते दानापुर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयाचे संबंधित मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत सुद्धा करण्यात आले आहे. ही गाडी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबणार आहे.
नक्कीच पुणे ते दानापूर दरम्यानची अतिरिक्त उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे ? याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
कस आहे वेळापत्रक ?
रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे-दानापूर उन्हाळी विशेष ( गाडी क्रमांक 01417 ) ही गाडी 28 मे 2025 आणि 1 जून 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे.
या दोन्ही दिवशी ही गाडी पुण्याहून सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी साडेसात वाजता दानापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात दानापूर-पुणे उन्हाळी विशेष (गाडी क्रमांक 01418 ) ही गाडी 30 मे 2025 आणि 3 जून 2025 रोजी दानापूर रेल्वे स्टेशन वरून सोडली जाणार आहे. या दोन्ही दिवशी ही गाडी दानापूरहून सकाळी साडेआठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 05 वाजून 35 मिनिटांनी ही गाडी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, ही उन्हाळी विशेष गाडी दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छोकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
अप आणि डाउन मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या गाड्या यासंबंधीत रेल्वे स्थानकावर थांबतील आणि यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.