पुणे, अहमदनगरकरांसाठी आनंदवार्ता ! Pune रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक?

पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. याच गोष्टीची दखल घेत आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणे जाणार आहे. या गाडीमुळे या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Pune Railway News : सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

आगामी काळात नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण येणार आहेत. या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. याच गोष्टीची दखल घेत आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणे जाणार आहे.

या गाडीमुळे या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळीच्या कालावधीत ही गाडी चालवली जाणार असल्याने या निर्णयाचा हजारो नागरिकांना फायदा होणार आहे.

दरम्यान आता आपण या दिवाळी विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते यासंदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार पुणे-नागपूर-पुणे स्पेशल ट्रेन चे वेळापत्रक?

पुणे-नागपूर-पुणे ही दिवाळी विशेष गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. ही साप्ताहिक ट्रेन २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यां काळात ही गाडी दर शनिवारी नागपूर रेल्वे स्थानकावरून रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी सोडली जाईल अन ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोहचणार आहे.

तसेच, पुण्याहून दर रविवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी ही दिवाळी विशेष गाडी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता नागपूरला पोहचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

ही गाडी या रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आदी स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe