Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न फारच जटील बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ता विकसित केला जाणार आहे.

दरम्यान याच प्रकल्पाच्या संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे रिंग रोड विकसित झाल्यानंतर यावर किती वर्ष पथकर आकारला जाणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
कसा आहे प्रकल्प ?
पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम दोन भागात विभागले गेले आहे. या प्रकल्पाचे काम पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागात पूर्ण केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आत्तापर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांशी जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.
पश्चिम रिंग रोड साठी 99% आणि पूर्व रिंग रोड साठी 98% जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेतून ज्या कंपन्यांना निवडण्यात आले आहे त्या संबंधित कंपन्यांना वर्कऑर्डर सुद्धा प्राप्त झाले आहे.
या प्रकल्पाचे काम एकूण 12 टप्प्यात केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेतून नऊ कंपन्या फायनल करण्यात आल्या आहेत आणि या संबंधित 9 कंपन्यांकडून आता या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाचे काम अडीच वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच या संबंधित कंपन्यांना आता अडीच वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.
जर समजा काही कारणास्तव कंपन्यांकडून दिलेल्या मुदतीत या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही तर अशा कंपनीच्या विरोधात योग्य ती दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
पुणे रिंग रोड हा असा एक प्रकल्प आहे त्यामुळे पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे शिवाय पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सुद्धा या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल. पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे या परिसरातील औद्योगिक विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे.
इतके वर्ष टोल वसुली केली जाणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प आगामी अडीच वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे रिंग रोड प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून टोल वसुली केली जाणार आहे.
पुणे रिंग रोड वरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एक निश्चित पथकर द्यावा लागणार असून रिंगरोड तयार झाल्यानंतर पुढील 40 वर्ष टोल वसुली केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 42 हजार 711 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.