Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होतोय. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान हीच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता शहरात दोन नवीन रिंग रोड तयार करण्यात येणार आहेत.
यातील एका रिंग रोडचे प्रत्यक्ष बांधकाम देखील सुरू झाले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुण्यात दोन रिंग रोड तयार करणार आहे. एक रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तयार करेल.

यापैकी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडच्या कामाला सुरुवात झाली असून आता याच प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नगर विकास विभागाने 5 तालुक्यातील 117 गावांचे नियोजन करण्यास आधीचं मान्यता दिली होती.
महत्त्वाची बाब म्हणजे या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असतानाच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विकास आराखड्यासाठी आता MSRDC ने आणखी 74 गावांची मागणी केली आहे.
यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नगर विकास विभागाला पत्र सुद्धा लिहिण्यात आले आहे. रिंग रोडमधील संपूर्ण पट्ट्याचे नियोजन एकात्मिक पद्धतीने करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या 74 गावांची मागणी करण्यात आली आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, पुरंदर, मुळशी आणि वेल्हे (राजगड) या पाच तालुक्यातील आणखी 74 गावांचा प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेतला असून या गावांची नगर विकास विभागाकडे मागणी करण्यात आली आहे.
या गावांचा समावेश केला जाणार?
हवेली – कोंढाणपूर, सांगरुण, आर्वी, गौडदरा, कल्याण, तानाजीनगर, मोरदारवाडी, अवसरे, रहाटवडे, शिवपूर, खेड शिवापूर, रामनगर
भोर – किकवी, ससेवाडी, शिंदेवाडी, कासुर्डी, शिवरे, वेळू, हरिश्चंद्री, कापूरहोळ, दिवळे, कामथडी, केळवडे, नसरापूर, नायगाव, वरवे बुद्रुक व वरवे खुर्द
पुरंदर – दिवे, पवारवाडी, जाधववाडी, केतकवले, चिवेवाडी, देवरी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, काळेवाडी, सोनोरी, सिंगापूर, झेंडेवाडी, गुन्होली व आंबोडी
मुळशी – अंबडवेत, भरे, कासार आंबोली, मुकाईवाडी, उरावडे, भुकूम, पिरंगुट, आंबेगाव व पौड
वेल्हे – कोंडगाव, आंबवणे, चिंचोळे बुद्रुक, करंजवणे, आडवली, आस्करवाडी, केतकवणे, कोलवाडी, लाशीरगाव, मार्गासनी, खांबवाडी, मांगदरी, विंजर, वांगणी, दापोडे, चिंचाळे खुर्द, बोरावळे, निगडे बुद्रुक, माळगाव, रांजणगाव, कातगाव, रांजणगाव.