पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट !

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पुणे रिंग रोड हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून याच प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

Published on -

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे आउटर रिंग रोड म्हणजेच पुणे बाह्यवळण मार्ग हा राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला एक महत्त्वाचा प्रकल्प असून हा प्रकल्प महायुती सरकारचा ही ड्रीम प्रोजेक्ट आहे.

या प्रस्तावित मार्गामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी दूर होण्याची शक्यता आहे सोबतच त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला देखील चालना मिळणार असा आशावाद तज्ञांकडून व्यक्त केला जातोय. दरम्यान आता याच पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.

काय आहे नवीन अपडेट ? 

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत प्राप्त माहितीनुसार, या प्रकल्पातील बाकी राहिलेल्या पॅकेजेस साठी वर्क ऑर्डर निघाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 172 किलोमीटर लांबीचा पुणे रिंग रोड दोन भागात पूर्ण केला जात आहे.

पुणे रिंग रोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाचे काम एकूण 12 पॅकेज मध्ये करण्याचा निर्णय राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाने घेतला असून या 12 पैकी नऊ पॅकेजेस साठी संबंधित पात्र ठरणाऱ्या कंत्राटदारांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे.

मात्र उर्वरित तीन पॅकेजेस म्हणजे E5, E6 आणि E7 या पॅकेजमध्ये जमिनीच्या अधिग्रहणास विलंब झाला होता आणि या पॅकेजेस साठी संबंधित कंत्राटदारांना वर्क ऑर्डर मिळाली नव्हती.

मात्र आता या तीनही पॅकेजेससाठी जमीन अधिग्रहण पूर्ण झाले असून लवकरच यांच्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड म्हणजेच कामाचे आदेश जारी होणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या 3 पॅकेजेसपैकी पॅकेज E5 साठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरने सर्वात कमी बोली लावली आहे. पॅकेज E6 साठी जीआर इन्फ्रा आणि पॅकेज E7 साठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपन्यांनी सर्वाधिक कमी बोली लावलेली आहे.

एकंदरीत आता या कंपन्यांना लवकरच काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. पुणे रिंग रोड हा पुण्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

कारण की हा प्रकल्प शहरातील वाहतूक सुरळीत करणार आहे तसेच शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करून पुणे महानगराच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका सुद्धा निभावणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!