पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट ! ‘या’ 3 गावांच्या विरोधामुळे प्रकल्प रखडणार ? 

Published on -

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शहरात दोन नवीन रिंग रोड विकसित केले जाणार आहेत.

यातील एक रिंग रोड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एक रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळ तयार करणार आहे. अशातच आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) प्रकल्पाबाबत कामाची माहिती समोर आली आहे.

पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम रखडल्याचे कारण समोर आले आहे. या रस्त्यासाठी पहिल्या टप्प्यातील मोजणी पूर्ण झाली आहे. पण दुसऱ्या टप्प्यातील मोजणीत मोठा अडथळा निर्माण झालाय.

या रस्त्याच्या भूसंपादनाला काही जमीन मालकांकडून जोरदार विरोध दाखवला जातोय. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनासाठी तीन गावांमधील नागरिकांनी विरोध दाखवला आहे. यामुळे या रस्त्याचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात सापडलंय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि बाधित जमीन मालकांच्या सातत्याने बैठका होत असून यातून काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पीएमआरडीए कडून विकसित केला जाणारा हा रस्ता 83 किलोमीटर लांबीचा व 65 मीटर रुंदीचा राहणार आहे. या प्रकल्पासाठी 115 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. जमीन संपादन पीएमआरडीए च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय करणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे संपादनासाठी टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. आता आपण पीएमआरडीएच्या रिंग रोड साठी कोणत्या गावांमध्ये जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि कोणत्या गावांमध्ये ही प्रक्रिया बाकी आहे याची माहिती पाहूयात.

मोजणी पूर्ण झालेली गावे 

आंबेगाव खुर्द

भिलारेवाडी

मांगडेवाडी

गुजर निंबाळकरवाडी

वडाचीवाडी

पिसोळ

सोळू

निरगुडी

वडगाव शिंदे 

मोजणी बाकी असणारी गावे

येवलेवाडी

जांभुळवाडी

कदमाकवस्ती 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News