Pune Solapur Railway News : फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्राला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या दोन मार्गावरील वंदे भारतचा समावेश आहे.
यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी ट्रेन पुणे मार्गे धावत आहे. या ट्रेनमुळे या मार्गावरील प्रवास सुपरफास्ट झाला आहे.

दरम्यान आता पुणे आणि सोलापूरवासियांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे राजधानी मुंबई ते कलबुर्गी दरम्यान एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतला आहे.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, आज आपण या ट्रेनचे वेळापत्रक आणि ही गाडी नेमक्या कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….
कसं राहणार वेळापत्रक
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई ते कलबुर्गी ट्रेन 17 मे 2023 रोजी चालवली जाणार आहे. ही ट्रेन रात्री साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कलबुर्गीच्या दिशेने रवाना होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता कलबुर्गी येथे पोहोचणार आहे. ही ट्रेन फक्त सीएसएमटी ते कलबुर्गी अशीच धावणार आहे म्हणजेच ही गाडी परतीचा प्रवास करणार नाही.
कुठं राहणार थांबे?
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कलबुर्गी दरम्यान धावणाऱ्या या एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि सोलापूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार आहे. निश्चितच या ट्रेनचा या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कशी राहणार एक्सप्रेस
17 मे ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कलबुर्गी दरम्यान धावणाऱ्या एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनला दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे ना ! मग पेरणीपूर्वी ‘हे’ महत्वाचं काम कराच, वाचा….