Recharge Plan : मागील काही महिन्यापासून ब्रॉडबँड कनेक्शन्स वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक दिग्ग्ज टेलिकॉम कंपन्या आपले शानदार ब्रॉडबँड प्लॅन लाँच करत आहे. प्रत्येक कंपन्या या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये वेगवेगळ्या ऑफर देत आहे.
त्यामुळे या सर्व कंपन्यांमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. असेच प्लॅन रिलायन्स जिओ आणि BSNLने आणले आहेत. ज्याची किंमत देखील खूप कमी आहे. इतकेच नाही तर 100Mbps इंटरनेट स्पीड आणि एका वर्षासाठी मोफत OTT प्लॅटफॉर्म दिले जात आहे.
जिओचा 799 रुपयांचा प्लॅन
Jio Fiber च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 100Mbps ची अपलोड तसेच डाउनलोड स्पीड मिळू शकेल. तर कंपनी 12 महिन्यांसाठी प्लॅनचे सदस्यत्व घेणाऱ्या वापरकर्त्यांसाठी एकूण 30 दिवसांची अतिरिक्त वैधता देते. तुमच्यासाठी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 400 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलवर मोफत प्रवेश देण्यात येत आहे.
तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये, तुम्हाला Eros Now, Lionsgate Play आणि ALT Balaji सोबत अनेक लोकप्रिय OTT अॅप्सवर मोफत प्रवेश दिला जाईल. कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Saavn आणि Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शन मिळू शकते.
BSNL चा 777 रुपयांचा प्लॅन
कंपनीचा 777 रुपयांचा प्लॅन 100Mbps च्या स्पीडसह येत असून या प्लॅनच्या वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला 9324 रुपये खर्चावे लागणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी 100Mbps चा शानदार स्पीड देत असून यात तुम्हाला FUP (फेअर यूसेज पॉलिसी) सह दर महिन्याला 1500 GB म्हणजेच 1.5 TB डेटा मिळणार आहे.
तर डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 5Mbps होते. कंपनीकडून हे कनेक्शन आणि प्लॅनसह राउटर मोफत देण्यात येत आहे. हे तुम्ही विनामूल्य बसवू शकता. परंतु कंपनीच्या या प्लॅनमध्ये मोफत OTT देण्यात येत नाही. ग्राहकांना 249 रुपये मासिक शुल्कावर OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करता येईल.