Pune Vande Bharat Railway : महाराष्ट्रात सध्या स्थितीला बारा जोडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन.
ही 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी ट्रेन भारतातील सर्वाधिक सुरक्षित ट्रेन म्हणून ओळखले जाते. या गाडीत प्रवाशांना सर्व प्रकारच्या आरामदायक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा, जलद प्रवास तसेच सुरक्षित प्रवास या सर्व कारणांमुळे ही गाडी कमी दिवसात प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. यामुळे वंदे भारत एक्सप्रेस चा प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
अशातच आता पुण्यातून धावणाऱ्या एका वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. पुण्यातून पुणे -कोल्हापूर, पुणे – हुबळी अन पुणे – नागपूर या थेट वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
तसेच मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन सुद्धा पुण्या मार्गे चालवली जात आहे. दरम्यान पुण्यातून चालवल्या जाणाऱ्या पुणे ते अजनी अर्थात नागपूर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
कारण की या गाडीच्या तिकीट दरात रेल्वे प्रशासनाने वाढ केली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने नवीन वर्षाच्या आधीच हा निर्णय घेतला असल्याने पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वेने आज पासून भाडेवाढ जाहीर केली आहे. नागपूर-पुणे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्यांचे तिकीट दर यामुळे वाढणार आहे. सर्वसामान्य ते वातानुकूलित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
नागपूर ते पुणे या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात सुद्धा यामुळे वाढ होणार आहे.
नागपूर ते पुणे धावणाऱ्या अन आधुनिक, वेगवान मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे चेअर कारचे भाडे 1596 रुपयांवरून 1616 रुपये, तर एक्झिक्युटीव्ह क्लासचे भाडे 3183 रुपयांवरून 3203 रुपये करण्यात आले आहे.