Pune Vande Bharat Railway : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील नागरिकांसाठी रेल्वे कडून लवकरच एक नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे.
सध्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातून तीन वंदे भारत ट्रेन सुरू आहे. यातील दोन वंदे भारत या थेट पुणे रेल्वे स्थानकावरून चालवल्या जातात तर एक वंदे भारत ट्रेन मुंबईवरून सुटते आणि पुण्या मार्गे सोलापूरला जाते.

पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या दोन वंदे भारत ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून सोडल्या जात आहेत. तसेच मुंबई सेंट्रल ते सोलापूर या दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत सुद्धा पुण्या मार्गे धावत आहे.
मात्र आता लवकरच पुण्याला चौथी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. दरम्यान आता आपण पुण्याला मिळणाऱ्या चौथ्या वंदे भारत ट्रेनची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार नवीन वंदे भारत ट्रेन?
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ते अमरावती या रेल्वे मार्गावर आता वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. अमरावतीला लवकरच पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार असे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून या गाडीला अमरावती जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत नागपूरला तीन वंदे भारत गाड्यांची भेट मिळालेली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी नागपूरला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली होती. नागपूर ते बिलासपूर या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस करण्यात आली. यानंतर, दुसरी वंदे भारत ट्रेन नागपूर – उज्जैन – इंदूर या मार्गांवर सुरू करण्यात आली.
त्यानंतर गेल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये नागपूर-सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. अशातच नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे नागपूर पुणे नागपूर या मार्गावर आता वंदे भारत ट्रेन सुरू होईल असे संकेत मिळत आहेत.
या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा सुद्धा झालेली आहे.
अमरावतीला मिळणार थांबा
पुणे ते नागपूर दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला अमरावती मधील बडनेरा येथे सुद्धा थांबा देण्यात आला आहे.
आतापर्यंत अमरावतीमधून एकही वंदे भारत ट्रेन सुरु झालेली नाही म्हणजेच नागपूर ते पुणे या दरम्यान धावणारी ही गाडी अमरावतीमधून जाणारी पहिली वंदे भारत ट्रेन ठरणार आहे.