पंजाब नॅशनल बँकेची एफडी योजना बनवणार मालामाल, 12 महिन्याच्या एफडीमध्ये 2 लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?

पंजाब नॅशनल बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेबाबत डिटेल माहिती पाहणार आहोत. पंजाब नॅशनल बँकेबाबत बोलायचं झालं तर ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. PNB आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे.

Tejas B Shelar
Published:

Punjab National Bank FD News : जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असाल आणि यासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा काही प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील एका मोठ्या सरकारी बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेबाबत डिटेल माहिती पाहणार आहोत. पंजाब नॅशनल बँकेबाबत बोलायचं झालं तर ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे.

PNB आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे. पीएनबी आपल्या ग्राहकांना विविध कालावधीच्या एफडी साठी 3.5% पासून ते 7.25% दराने व्याज देत आहे.

12 महिन्यांच्या एफडी वर किती व्याज मिळते?

पंजाब नॅशनल बँक बारा महिन्याच्या एफडी वर आपल्या सामान्य ग्राहकांना 6.80% दराने व्याज देत आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांवरील ग्राहकांना या बँकेकडून बारा महिन्यांच्या एफडीवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे म्हणजेच या कालावधीच्या एफडीवर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.30 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

12 महिन्यांच्या एफडीत दोन लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

एखाद्या सामान्य ग्राहकाने पंजाब नॅशनल बँकेच्या बारा महिन्यांचा एफडी दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना 6.80% व्याज दराने दोन लाख 13 हजार 951 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 13 हजार 951 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

जर सिनिअर सिटीजन ग्राहकांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बारा महिन्यांचा एफडीत दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना 7.30% व्याजदराने दोन लाख 15 हजार 5 रुपये मिळणार आहेत. अर्थातच सिनिअर सिटीजन ग्राहकांना 15 हजार पाच रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

FD चे फायदे काय आहेत?

बँकेची एफडी योजना ही पूर्णपणे सुरक्षित असते. यात गुंतवणूक केल्यास ग्राहकांना एक निश्चित परतावा मिळतो. अलीकडे बँकांकडून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज देखील दिले जात आहे. यामुळे फिक्स डिपॉझिटचा पर्याय हा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe