पंजाब नॅशनल बँकेच्या 400 दिवसांच्या एफडी योजनेतील गुंतवणूक ठरणार फायदेशीर ! किती परतावा मिळतोय ? वाचा….

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर चांगला जबरदस्त परतावा देत आहे. बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना सर्वाधिक व्याज ऑफर करणारी योजना म्हणून ओळखली जाते.

Tejas B Shelar
Published:
Punjab National Bank FD Scheme

Punjab National Bank FD Scheme : भारतात सध्या दीपोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. खरंतर दिवाळीच्या सणाला नवीन कामाची सुरुवात केली जाते. अनेकजण दिवाळीला नवीन व्यवसाय सुरू करतात. काही लोक नवीन वाहन तसेच नवीन मालमत्ता खरेदी करतात.

याशिवाय दिवाळीच्या काळात अनेक जण गुंतवणुकीला देखील प्राधान्य दाखवतात. दरम्यान जर तुमचाही यंदाच्या दिवाळीत गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण देशातील एका प्रमुख सरकारी बँकेच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांची एफडी योजनेची आज आपण माहिती पाहणार आहोत.

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर चांगला जबरदस्त परतावा देत आहे.

बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना सर्वाधिक व्याज ऑफर करणारी योजना म्हणून ओळखली जाते. आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

पंजाब नॅशनल बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना

जर तुम्हीही यंदाच्या दिवाळीत पंजाब नॅशनल बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे.

खरे तर पंजाब नॅशनल बँक एफडीवर 3.50% पासून ते 7.25% पर्यंतचे व्याज ऑफर करते. ही बँक चारशे दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.25 % या दराने परतावा देते.

तसेच, याच कालावधीच्या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहक आणि गुंतवणूक केली तर त्यांना 0.50% अधिकच्या दराने परतावा मिळतो. या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75% या इंटरेस्ट रेट ने रिटर्न दिले जात आहेत.

10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?

पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेत जर एखाद्या ग्राहकाने दहा लाख रुपये गुंतवले तर त्याला किती रिटर्न मिळणार असा प्रश्न विचारला जातोय.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेत सामान्य ग्राहकांनी दहा लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना दहा लाख 81 हजार 341 रुपये मिळणार आहेत. अर्थात सामान्य ग्राहकांना 81,341 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

तसेच जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी यामध्ये दहा लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना दहा लाख 87 हजार 173 रुपये मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 87 हजार 173 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe