पंजाब नॅशनल बँकेची 506 दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! 4 लाख रुपये गुंतवले तर ‘इतके’ रिटर्न मिळणार

मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या 506 दिवसांच्या मुदत ठेव योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. ही बँकेची सर्वाधिक व्याज देणारी मुदत ठेवी योजना असून यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील फारच अधिक आहे.

Published on -

Punjab National Bank News : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 506 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक परतावा दिला जात असून आज आपण याच एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

यामुळे जर तुम्ही ही एका वर्ष्याहून अधिक काळासाठी तुमच्याकडील पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेची ही एफडी योजना एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.

कशी आहे पंजाब नॅशनल बँकेची 506 दिवसांची एफडी योजना?

मिळालेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेकडून 506 दिवसाच्या योग्य योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.70% व्याजदर आणि परतावा दिला जात असून याच एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांवरील अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना 7.20% दराने व्याज दिले जात आहे.

एवढेच नाही तर सुपर सीनियर सिटीजन लोकांना या एफ डी योजनेत गुंतवणूक केल्यास यापेक्षा अधिकचा परतावा मिळतो. बँकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सुपर सीनियर सिटीजन लोकांनी या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना सीनियर सिटीजन लोकांपेक्षा 0.30% अधिकचा प्रताप मिळणार आहे म्हणजेच सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.50% दराने व्याज मिळणार आहे.

अर्थातच पंजाब नॅशनल बँकेची ही एफडी योजना सामान्य ग्राहकांपेक्षा सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे. आता आपण पंजाब नॅशनल बँकेच्या याच एफ डी योजनेत एखाद्या ग्राहकाने चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला किती रिटर्न मिळणार याबाबतचे कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

चार लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

एखाद्या सामान्य ग्राहकाने पंजाब नॅशनल बँकेच्या पाचशे सहा दिवसांच्या एफ डी योजनेत चार लाखाचे गुंतवणूक केली तर त्याला 6.70% व्याजदराने चार लाख 38 हजार 595 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

जर याच एफडी योजनेत सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना साडेसात टक्के दराने चार लाख 43 हजार 400 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 43400 व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe