राहुरीत भाजपाचे शिवाजीराव कर्डिले यांनी माजी मंत्री तनपुरे यांना 34,755 मतांनी पराभूत केले ! कर्डिले यांच्या विजयाची कारणे कोणती ?

2019 च्या निवडणुकीत तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला आणि यावेळी कर्डिले यांनी 2019 च्या पराभवाचा वचपा काढला आहे. कर्डिले 34,755 मतांनी यावेळी विजयी झालेत. या मतदारसंघात एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. परंतु भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार गटाचे उमेदवार या दोघांमध्येच येथे काटे की टक्कर झाली.

Tejas B Shelar
Published:
Rahuri Politics News

Rahuri Politics News : राहुरी विधानसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांनी बाजी मारली आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत येथून प्राजक्त तनपुरे यांचा विजय झाला होता. यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा मंत्री पद भूषवणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला आहे.

2019 च्या निवडणुकीत तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला आणि यावेळी कर्डिले यांनी 2019 च्या पराभवाचा वचपा काढला आहे. कर्डिले 34,755 मतांनी यावेळी विजयी झालेत. या मतदारसंघात एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते.

परंतु भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार गटाचे उमेदवार या दोघांमध्येच येथे काटे की टक्कर झाली. कर्डिले आणि तनपुरे यांच्यात या ठिकाणी सरळ लढत झाली. या लढतीत शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी परिसरात म्हणजे ज्या ठिकाणी तनपुरे यांची ताकत आहे त्याच ठिकाणी तनपुरे यांच्यापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवले हे विशेष.

या भागात तनपुरे यांच्यापेक्षा शिवाजीराव कर्डिले यांनी 5000 हुन अधिक मते मिळालीत. नगर व पाथर्डी परिसरातील मतदारांनी देखील कर्डिले यांच्यावर भरोसा दाखवला आहे. या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झालेत. गुंडगिरी, दहशत व दडपशाही असे अनेक आरोप एकमेकांवर लावले जात होते.

सोबतच हे दोन्ही उमेदवार विकास कामांचा लेखाजोखा देखील जनतेमध्ये मांडत होते. यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रचार हा खूपच हायवोल्टेज ठरला. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्डिले यांच्या विजयामागील कारणे कोणती? आता आपण याचाच सविस्तर आढावा घेणार आहोत.

कर्डिले यांच्या विजयाची कारणे

महायुती सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये ज्या योजना सुरू केल्यात त्या कल्याणकारी योजनेचा लाभ कर्डिले यांनी मतदारसंघातील जनतेला मिळवून देण्यात भूमिका निभावली. लाडकी बहीण योजनेचा कर्डिले यांना फायदा झाला.

दुसरीकडे शरद पवार गटातून जी आउटगोइंग सुरू होती आणि भारतीय जनता पक्षात जी इन्कमिंग सुरू होती याचा सुद्धा फायदा कर्डिले यांना झाला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे तसेच संभाजी ब्रिगेडचे राजूभाऊ शेटे यांनी तनपुरेंची साथ सोडून कर्डिलेंना मदतीचा हात दिला होता.

हिंदुत्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजना, पीक विमा, वीजबिल माफी अशा अनेक योजना महायुती सरकारने राबविल्यात. अन महत्त्वाचे म्हणजे स्वतः जातीने लक्ष देत कर्डिलेंनी या योजना घरोघरी जाऊन पोहोचविल्यात.

दुसरीकडे अक्षय कर्डिले यांनी तरुणांशी जनसंपर्क वाढवला आणि या तरुणांच्या जनसंपर्कामुळे कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe