RailOne Application : भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तरी देखील रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करत असतात.
खरे तर रेल्वेने देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाता येते आणि महत्त्वाचे म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणारा असतो. यामुळे देशात रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे. भारतीय रेल्वे कडूनही प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

अशातच आता रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले असल्याची बातमी समोर आली आहे. या नव्या एप्लीकेशन मुळे आता देशातील रेल्वे प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या नव्या ॲप्लिकेशनची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
कोणते आहे हे अँप्लिकेशन?
RailOne अँप हे नवीन ॲप्लिकेशन भारतीय रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केले आहे. हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या तसेच एप्पल म्हणजेच आयओएस फोन वापरणाऱ्यांसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
IRCTC सारख्या वेबसाईटवरून रेल्वे प्रवाशांना जास्त सुविधा उपलब्ध करून दिला जात आहेत तशाच सुविधा आता प्रवाशांना या एप्लीकेशन मधून मिळणार आहेत. पण नव्याने लॉन्च करण्यात आलेले मोबाईल ॲप्लिकेशन हे वापरण्यासाठी वेबसाईट पेक्षा सोपे आहे.
शिवाय वेबसाईट पेक्षा अधिक सुविधा या नव्या ॲप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
एप्लीकेशनमध्ये कोण कोणत्या सुविधा मिळणार
रेल्वेने लाँच केलेल्या या नव्या एप्लीकेशन मध्ये प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जसे की, आरक्षित आणि अनारक्षित तिकीटे काढणे, ट्रेनची चौकशी करणे, प्लॅटफॉर्म तिकीट काढणे, पी एन आर ची माहिती मिळवणे, रेल मदत सेवेचा लाभ घेणे, प्रवासाचे नियोजन करणे, ट्रेनमध्ये जेवण मागवणे अशा प्रकारच्या सुविधा या ॲप्लिकेशन मध्ये आहेत.
एप्लीकेशन ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे RailConnect किंवा UTS on Mobile ॲपचे यूजर असणाऱ्या प्रवाशांना त्याचा आयडी आणि पासवर्ड वापरून या ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन करता येणे शक्य होणार आहे. या ॲप्लिकेशन साठी सिंगल साइन ऑन हा पर्याय उपलब्ध आहे.
म्हणजेच प्रवाशांना आता वेगवेगळे पासवर्ड ध्यानात ठेवण्याची गरज नाही. नक्कीच यामुळे हे ॲप्लिकेशन वापरणे अधिक सोयीचे आणि सोपे राहणार आहे. या एप्लीकेशन मध्ये आर वॉलेट म्हणजेच रेल्वे e-wallet सुद्धा आहे.
सुरक्षा साठी यात mPIN आणि बायोमेट्रिक लॉगिन सुद्धा देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या एप्लीकेशन मध्ये गेस्ट लॉगिन हा पर्याय सुद्धा आहे. नक्कीच भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे ॲप्लिकेशन फारच फायद्याचे ठरणार आहे.
अँप्लिकेशन कुठून डाउनलोड कराल?
भारतीय रेल्वे कडून लॉन्च करण्यात आलेले हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड युजर प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात आणि आयओएस युजर आयओएस स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर https://play.google.com/store/apps/details?id=org.cris.aikyam या लिंक वर जाऊन तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे.