महाराष्ट्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय विकसित आणि भारतामध्ये महत्त्व असलेले गोवा या दोन राज्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांकडून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. जर आपण मुंबई ते गोवा या दोन राज्यादरम्यानचा अंतराचा विचार केला तर ते जवळपास 586 किलोमीटरचे आहे.
हे अंतर पार करण्यासाठी पावसाळा व्यतिरिक्त इतर काळामध्ये या एक्सप्रेसला आठ तास लागतात. परंतु पावसाळ्यामध्ये या वंदे भारत एक्सप्रेस चा कालावधी हा दहा तासाचा आहे. त्यामुळे आपण इतर रेल्वे गाड्यांचा विचार केला तर त्यांच्या तुलनेमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासात मुंबई ते गोवा यादरम्यानच्या अंतर पार करण्यासाठी तब्बल तीन ते चार तासांचा वेळ वाचतो. या सगळ्या सकारात्मक बाबींमुळे वंदे भारत एक्सप्रेसला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

परंतु यामध्ये समस्या अशी आहे की आठ ते दहा तासांचा हा प्रवास पार करताना प्रवाशांना ताटकळत बसून हा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसची जी काही बांधणी करण्यात आलेली आहे ते चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये बैठक व्यवस्था म्हणजेच आसन श्रेणी असलेली वंदे भारत तयार करण्यात आली. परंतु कमी कालावधीच्या प्रवासासाठी अशा रचनेची वंदे भारत एक्सप्रेस उपयुक्त आहे. परंतु मुंबई ते गोवा सारखे आठ ते दहा तासाच्या प्रवासासाठी ही एक्सप्रेस त्रासदायक होत आहे.
वंदे भारत येणार आता स्लीपर कोच सोबत
मुंबई ते गोवा हे 586 किलोमीटरचे अंतर असून ते पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यात दहा तास तर इतर कालावधीत आठतास लागतात.इतका दीर्घ कालावधीत बसून प्रवास करणे हे खूप जीकीरीचे ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांचा हा कंटाळवाणा प्रवास आरामशीर करण्याच्या दृष्टिकोनातून आता वंदे भारत मध्ये आसन श्रेणीमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून आता शयनयान डबे म्हणजेच स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे.
त्या पद्धतीची नियोजन देखील आता रेल्वे मंडळाकडून सुरू करण्यात आलेले आहे. रेल्वे मंडळाने चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीला तशा सूचना देखील केल्या आहेत. साधारणपणे डिसेंबर 2023 पर्यंत हे स्लीपर कोच असलेली वंदे भारत तयार करण्याचे एकंदरीत नियोजन करण्यात आलेले आहे.
त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे मार्गाचे जे काही अंतराची मर्यादा आहे ती 550 किलोमीटर पेक्षा जास्त असेल. संपूर्ण देशामध्ये वंदे भारत एक्सप्रेस आता स्लीपर कोच असलेली येणार आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबई ते गोवा हा प्रवास अगदी आरामात झोपून आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत करता येणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे साधारणपणे स्वरूप
साधारणपणे शंभर किलोमीटर पेक्षा कमी अंतरासाठी वंदे मेट्रो, शंभर ते ५५० किलोमीटर साठी वंदे चेअर कार आणि 550 किलोमीटर पेक्षा जास्तीच्या प्रवासाकरिता वंदे स्लीपर कोच असे साधारणपणे स्वरूप असणार आहे.